पहाटे 4 वाजता बॉयफ्रेन्ड करत होता ‘असं’ काही, महिलेने ‘स्मार्ट’वॉचच्या मदतीनं पकडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या फिटबिट्सचा वापर मोठ्या प्रमाण होताना दिसत आहेत. आता तर हे फिटबिट्स आपल्या लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग बनले आहेत. याला कारणही तसेच आहे. ते आपले स्टेप्स, हार्टबिट्स, झोपेच्या दर्जासहित सर्व अ‍ॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवते. परंतू तुम्हाला सांगितले की या फिटबिटमुळे एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफेंडचे एक चीटिंग पकडली तर तुम्हाला खरे वाटेल?

एका वृत्तानुसार सांगण्यात आले की गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडची चीटिंग कशी पकडली.

एक यूजर अल्बर्ट बियर यांच्या ट्विटमध्ये उत्तरादाखल स्लेटरने लिहिली की, माझ्या एक्स बॉयफ्रेंडने मला क्रिसमसला फिटबिट घेऊन दिले होते. मला ते खूप आवडले होते. आम्ही दोघं एकमेकांवर खूप विश्वास ठेवत असतं. परंतू मी एकदा सकाळी चार वाजता या फिटबीटमध्ये काही वेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी होताना पाहिले. माझ्या बॉयफ्रेंडच्या फिजीकल अ‍ॅक्टव्हिटीची लेवल वाढलेली दिसत होती. परंतू ती ट्विटच्या शेवटी लिहिते की अपेक्षा आहे की कदाचित ते सत्य नसेल. परंतू त्यानंतर याच ट्विटच्या सीरिजमध्ये ती पुढे लिहिते, तो 4 वाजताच्या ऑरेंज क्लासमध्ये इनरोल्ड नव्हता. ऑरेंज थेअरी फिटनेस क्लास एक प्रकारचा फिटनेस क्लास असतो ज्यात 12 मिनिट इन्टंट वर्क आऊट करायचे असते.

स्लेटरच्या स्टोरीच्या समर्थनात अनेक ट्विटद्वारे संमिश्र प्रतिक्रिया आल्या, एका व्यक्तीने ट्विट केले की, मी या प्रकराच्या जितक्या कथा ऐकतो, तेव्हा मला वाटते की मी सिंगल आहे हे बरे आहे. स्लेटरच्या या ट्विव्टवर अनेक लोकांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

फेसबुक पेज ला लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/