महिलेने घातला दीड कोटींचा गंडा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – बचत गटामार्फत स्वस्तात सोने व अन्य वस्तू देण्याचे आमिष दाखवून महिलांना सुमारे दीड कोटी रुपयांचा गंडा घालून महिला पसार झाली आहे. सुरेखा मनाजी म्हेत्रे (रा. पुंडलिकनगर, औरंगाबाद, मुळ शिवाजीनगर, निलंगा, जि़ लातूर) असे या महिलेचे नाव आहे.

रभणीतील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आणि सुरेखा म्हेत्रे यांनी केलेल्या फसवणूकीची माहिती या महिलांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन दिली आहे. पुंडलिकनगर येथील किमान ५० महिलांना या दोघांनी गंडा घातला आहे. महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन, घरगुती वस्तू मूळ किंमतीपेक्षा स्वस्त दराने देऊन सुरेखा म्हेत्रे हिने सर्वांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी बचत गटामार्फत दुचाकी योजना आणली. १० महिलांच्या नावावर रक्कम ठेवा. गावंडे हे आपल्याला सबसिडी देतात, त्यानंतर शोरुमला रक्कम जमा झाली की, दुचाकी मिळते. त्यावरुन अनेकींनी तिच्याकडे रक्कम गुंतविली. दुचाकीप्रमाणे चारचाकी वाहनांची योजना त्या महिलेने आणली. अनेक गाड्या स्वत: गावंडे यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आल्या. कार्यक्रमात गावंडे सांगायचे की सर्व योजना माझ्या सहीने मंजुर होतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हेत्रे यांच्याकडे रोख रक्कम द्या, तुमचा फायदा होईल.

सुरेखा म्हेत्रे हिच्या पुंडलिकनगर येथील घरी गावंडे वास्तव्यास यायचे. गावंडे यांच्या आश्वासनामुळे अनेक नागरिकांनी सुरेखा म्हेत्रे हिच्याकडे मोठी रक्कम गुंतविली. अनेकांनी आपल्याकडील ३० लाख, १० लाख रुपये तर कोणी २१ लाख रुपये अशा रक्कमा गुंतविल्या.

त्यातील अनेकांना म्हेत्रे हिने दिलेले चेक बाऊन्स झाले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लोकांच्या लक्षात आले. त्यामुळे १५ ऑगस्टपासून म्हेत्रे फरार झाली आहे. तिचा शोध लागत नसल्याने नागरिकांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन त्यांना याची माहिती दिली.

विश्वंभर गावंडे याने आता आपला त्या महिलेशी काही सबंध नाही, तिने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी केवळ हजेरी लावली असे सांगत स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस सुरेखा म्हेत्रे हिचा शोध घेत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like