Imran Khan । इम्रान खान यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘बलात्कारासाठी महिलांचे कपडे जबाबदार’

पाकिस्तान : वृत्तसंस्था – मागील काही महिन्यापूर्वी पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी एक विवादास्पद भाष्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी आताही एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इम्रान खान (Imran Khan) यांनी अत्याचाराच्या घटनेसंदर्भात महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे.(Imran Khan’s controversial statement once again)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

अ‍ॅक्सिओस ऑन एचबीओ” ला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) म्हणाले की, जर एखाद्या महिलेने फार कमी कपडे घातले असतील तर त्याचा पुरुषांवर परिणाम होतो. त्या रोबोट असल्यास हे घडणार नाही. ही केवळ शहाणपणाची बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इम्रान खान (Imran Khan) यांनी यापूर्वी पाकिस्तानमध्ये लैंगिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये होणाऱ्या अश्लीलतेला दोष दिला होता. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, पडद्याची ही संपूर्ण संकल्पना मोह टाळण्यासाठी आहे. सर्वांनी ते टाळण्याची इच्छा नसते.

पंतप्रधान इम्रान खानच्या (Imran Khan) या विधानावर समाज माध्यमावर रोष व्यक्त होत आहे. इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर विरोधी पक्ष नेते आणि पत्रकार जोरदार टीका करीत आहेत. दक्षिण आशियातील आंतरराष्ट्रीय न्यायिक आयोगाचे कायदेशीर सल्लागार रीमा ओमर यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे की, ‘पाकिस्तानमधील लैंगिक हिंसाचाराच्या करणाबाबत पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पुन्हा एकदा पीडितेला दोष देणे. हे अत्यंत निराशाजनक विधान आहे. असं ओमर यांनी म्हटलं आहे. तसेच,

या दरम्यान, बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्यांच्या सरकारने घेतलेल्या पाऊलांबाबत एका सवालावर इम्रान खान (Imran Khan) यांनी उत्तर दिलं होतं. एप्रिलमध्ये इम्रान खान यांच्या टीकेनंतर अनेकांनी त्यांना माफी मागावी म्हणून निवेदनावर स्वाक्षरी केली होती. दरम्यान, डिजिटल माध्यमांवरील पंतप्रधानांचे फोकल पर्सन डॉ. अरसलन खालिद (Arsalan Khalid) यांनी म्हटलं आहे की, “इमरान खान (Imran Khan) यांनी केलेल्या वक्तव्याचे संदर्भाव्यतीरीक्त ट्वीट केले जात आहेत. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. ते आपण कोणत्या प्रकारच्या समाजात राहत आहोत आणि समाजातील लैंगिक निराशेबद्दल बोलले होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : women clothing responsible for rape in pakistan strange statement by pm imran khan

हे देखील वाचा

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Coronavirus | दिलासादायक ! राज्यातील ‘या’ 15 शहरात एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही, आरोग्य विभागाची माहिती