धक्कादायक ! सासूच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेची आत्‍महत्‍या

कोल्‍हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सासूच्या निधनाचा धक्का सहन न झाल्‍याने सूनेने आत्‍महत्‍या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरच्या आपटेनगर परिसरात घडली आहे. मालती मधुकर लोखंडे असं सासूचं नाव असून शुभांगी संदिप लोखंडे (वय ३९) असं आत्महत्या केलेल्या सुनेचे नाव आहे. या घटनेमुळे लोखंडे कुटूंबियांवर दुहेरी दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , सासू मालती या कर्करोगाच्या आजाराने गेले काही दिवस त्रस्त होत्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु त्यांचा आज सकाळी राहत्या घरीच उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सून शुभांगी यांना हा धक्का सहन न झाल्याने त्यांनी घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. उडी मारण्यापूर्वी शुभांगी यांनी घरातला अंगारा फुंकल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेची सर्व चौकशी करण्यासाठी जुना राजवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

ह्याहि बातम्या वाचा-

अप्पर पोलीस महासंचालक परम बीर सिंग यांची महसंचालकपदी नियुक्‍ती

सांगली लोकसभेसाठी कॉंग्रेसकडून प्रतीक पाटील यांच नाव आघाडीवर…

खुशखबर ! SBI ने केली होम आणि ऑटो लोनवरील व्याजदरात घट ; ‘या’ दिवसापासून लागू

उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंची शरद पवारांनी केली दिलजमाई