TikTok व्हिडीओ बनवल्यामुळं निलंबीत झाली होती ‘ही’ पोलिस कर्मचारी, आता बनली स्टार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगामध्ये कोणाचे कधी भाग्य चमकेल आणि ते प्रसिद्ध होईल हे कोणीच सांगू शकत नाही. असेच काहीसे झाले आहे गुजरात महिला पोलिस अर्पिता चौधरी यांच्या बाबतीत…काही दिवसांपूर्वी गुजरात पोलिस महिला कॉन्स्टेबलला महिला पोलिस स्टेशनमध्ये टिकटॉक व्हिडिओ बनवल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. परंतु त्या महिलेला माहित नव्हते की एका व्हिडिओमुळे त्या निलंबित होतील. टिकटॉकचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला कॉन्स्टेबल अर्पिता गुजरातची अभिनेत्री बनली आहे. इतकेच नाही तर नुकताच त्यांचा गुजराती अल्बम ‘टिक टॉक की दिवानी’ लाँच झाला आहे.

अर्पिता यांच्या व्हिडिओला तीन दिवसातच सुमारे 2 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. जिग्नेश कविराज हा या अल्बमचा गायक आहे. मनु रबारी यांनी याचे बोल लिहिले आहेत. याशिवाय अर्पिता यांचे आणखी व्हिडिओ लॉन्च करण्यात आले आहेत. एका धार्मिक व्हिडिओमध्ये अर्पिता यांनी एक गाणेही गायले आहे. इतकेच नाही तर कच्ची केरी, पक्की केरी नावाच्या अल्बममध्ये धावल बारोत अभिनेत्याबरोबर त्यांनी काम केले आहे. अर्पिता म्हणाल्या की, त्यांना बर्‍याच चित्रपटांच्या ऑफर देखील मिळाल्या आहेत पण त्या सध्या आपल्या अधिकाऱ्यांच्या परवानगीची वाट पाहत आहेत.

अर्पिता चौधरी म्हणाल्या की, निलंबित झाल्यानंतर त्यांनी ‘अरबुदा मा’ यासह चार व्हिडिओ अल्बममध्ये काम केले आहे. अर्पिता काडी पोलिस स्टेशनमध्ये तैनात आहे. अर्पिता म्हणाल्या की, ‘जेव्हा जेव्हा मी तपासासाठी बाहेर पडते तेव्हा लोक सेल्फी घेण्यास सुरुवात करतात. बॉलिवूडमध्ये काम करण्याबद्दल त्या म्हणतात की ‘बरीच ऑफर आहेत पण मला परवानगी घ्यावी लागेल, मी अभिनय करेन.’

गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यातील महिला कॉन्स्टेबल अर्पिता चौधरी यांनी पोलिस स्टेशनमध्ये चित्रपटाच्या गाण्यावर टिकटॉक व्हिडिओ बनविला, त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. अर्पिता यांना निलंबित केले गेले तो व्हिडिओ आपण पाहू शकता… व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अर्पिता चौधरी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. अर्पिता चौधरी यांना पोलिस अधिकाऱ्यांनी निलंबित केले. ज्यासाठी अधिकारी म्हणाले की, अर्पिता चौधरी यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. ते म्हणाले की अर्पिता चौधरी ड्युटीच्या वेळी गणवेशात नव्हत्या आणि त्यांनी पोलिस ठाण्यात व्हिडिओ बनवला जो चुकीचा आहे. 2016 मध्ये आरएलडीमध्ये दाखल झालेल्या अर्पिता चौधरी यांना 2018 मध्ये मेहसाना येथे पोस्ट केले गेले होते.