माहिमनंतर कल्याण स्टेशनवर बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवसांपूर्वी माहिमच्या बीचवर एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता कल्याण स्टेशनच्या परिसरात एका महिलेचा मृतदेह एका बॅगेत आढळून आला आहे. टँक्सी स्टँड परिसरात ही बॅग आढळून आली असून बॅगेत असलेल्या मृतदेहाचे शिर आणि धड गायब आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्टेशन परिसरात बॅग ठेवणारा सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या परिसरात असलेले सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले असून प्रवाशांकडे चौकशी करण्यात येत आहे. मात्र, गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी केलेल्या सीसीटीव्ही तपासात दोन आरोपी असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी माहिम बीचवर असाच खळबळजनक प्रकार समोर आला होता. एका बॅगेत एका मानवी अवयव सापडले होते. हा खूनाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आलं असून पोलिसांनी वाकोल्यातून 19 वर्षीय तरुणीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखा युनिट 5 च्या पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला होता. मयत व्यक्तीच्या दत्तक मुलीला तिच्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like