कोंढव्यात डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव जाणाऱ्या डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेच्या अंगावरुन चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात कोंढवा मुख्य रस्त्यावरील संत गाडगे महाराज शाळेजवळील शिवनेरीनगर येथे शनिवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.

नसरीन जाफर सय्यद (वय ५०, रा. कोंढवा) असे अपघातात मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सय्यद जाफर हे आपली पत्नी नसरीन सय्यद यांना दुचाकीवरुन घेऊन जात असताना शिवनेरीनगर समोर पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली. त्यात ते रस्त्यावर पडले. डंपरचे चाक नसरीन यांच्या पोटावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

कोंढवा गावातून जड वाहनांना बंदी असतानाही सर्रासपणे वाहने जात असतात. जड वाहनांना कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like