विहिरीचा कठडा तुटून एका चिमुकलीसह दोन महिलांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

एका धार्मिक कार्यक्रमासाठी काही महिला आज साडेसहा वाजताच्या सुमारास विलेपार्ले येथील रुईया बंगलो, दीक्षित रोड, सॅटेलाईट हॉटेलजवळ जमल्या होत्या. मात्र, या ठिकाणी पूजेचा कार्यक्रम सुरु असताना विहिरीचा कठडा तुटून विहिरीत काही महिला व मुले पडली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोचले आणि  विहिरीत पडलेल्यांना बाहेर काढले. या घटनेत एका चिमुकल्यासह दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cb1a8127-c65d-11e8-be8e-f575b50fef3e’]

माधवी पांडे (वय – ४९), रेणू  यादव (वय २०) आणि ३ वर्षीय दिव्या अशी मृतांची नावे आहेत.

विलेपार्ल्यातील शिवसागर हॉटेलच्या मागील भागात दीक्षित रोडवर असलेल्या विहिरीत ही दुर्घटना घडली. कुंकूवाडी भागात राहणाऱ्या विश्वकर्मा समाजातील महिला पूजेसाठी विहिरीजवळ असलेल्या देवळात गेल्या होत्या. पूजेनंतर महिला विहिरीजवळ बसल्या असताना संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास स्लॅब तुटला आणि १२ महिला आणि चिमुकला विहिरीत पडला.

[amazon_link asins=’B019SZCXEI,B01I79I3PY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d8fce347-c65d-11e8-81a0-d19dd1dcb23c’]

उपस्थितांनी तात्काळ साड्या, ओढण्या यांच्या मदतीने काही महिलांना विहिरीतून बाहेर काढलं. अग्निशमन दलाचे जवान, महापालिका प्रशासन, पोलिस यांना स्थानिकांनी बचावकार्यात मदत केली. विहिरीतून तीन महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाणी उपसल्यानंतर बचावकार्य थांबवण्यात आलं. याबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या

जाहिरात.