शासकीय योजनांमुळे ग्रामीण भागातील महीला सक्षम : विकास रासकर

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – केंद्रसरकार व राज्यसरकार यांच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील बहुजन, ओबीसी, मागासवर्गीय, व इतर मागासवर्गीय सर्वसामाण्य यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील महीला सक्षम व स्वावलंबी बनत आहेत. त्यामुळे त्यांचा कुटुंबाला मोठा फायदा होत असुन सर्वसामाण्य जनतेला सध्याचे सरकार न्याय देत असल्याने ग्रामीण भागातील महीला सक्षम बनत चालल्या असल्याचे मत भारतीय जनता पार्टी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विकासअण्णा रासकर यांनी इंदापूर येथे ओबीसी मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

रासकर हे इंदापूर येथे क्रांती ज्योती विचारमंच संस्थापक अध्यक्ष पांडूरंगतात्या शिंदे आयोजित इंदापूर तालुका बहुजन ओबीसी महिला मेळाव्यात अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी पूणे जिल्हापरिषद सदस्या कु. अंकिताताई पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, क्रांती ज्योती वाचार मंचचे अध्यक्ष पांडूरंग तात्या शिंदे, आरपीआय इंदापूर तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, माजी नगराध्यक्षा मायाताई विंचु, माजी नगराध्यक्षा नलिनिताई शिंदे, माजी नगराध्यक्षा उज्वलाताई राऊत, सविताताई बंगाळे इत्यादी प्रमुख माण्यवर म्हणून उपस्थित होते.

यावेळी आरपीआयचे नंदकुमार केंगार बोलताना म्हणाले की भाजप सरकारने ग्रामिण भागामध्ये शासनाच्या योजनांच्या माध्यमातुन आनेक छोटी मोठी कामे केलेली आहेत. तसेच कर्जरूपाने आर्थिक मदत देवुन उद्योगधंदे निर्माण केलेले आहेत. महीला बचत खाते हे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचेकडे असुन जानकर साहेबांनी तालुक्यातील गोरगरीब महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचा शब्द पांडूरंगतात्या शिंदे यांना दीलेला आहे. त्यामुळे इथुन पुढच्या काळात तालुक्यातील महिलांना बचतगटाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळणार असल्याने इंदापूर तालुक्यातील महीलांना त्याचा फायदा होणार आहे.

त्यामुळे तालुक्यातील सर्वांनी मिळुन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन हर्षवर्धन पाटील यांना विक्रमी मताधीक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी इंदापूर तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात महीला मेळाव्यासाठी उपस्थित होत्या. पांडूरंग शिंदे, मायाताई विंचु यांचीही भाषणे झाली. यावेळी आरपीआयच्या वतीने कु.अंकिताताई पाटील व पांडूरंग तात्या शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

You might also like