सिरींजने रक्त काढून ‘त्या’ संचालिकेने रचली सामुहिक बलात्काराची ‘स्टोरी’, वाचून थक्‍क व्हाल

अमरोहा (युपी) : वृत्तसंस्था – रुग्णालयाच्या महिला संचालिकेने आपल्यावर गँगरेप झाल्याचे सांगून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांच्या तपासात तिने गँगरेपचा बनाव रचल्याचे उघड झाल्याने महिलेचे पितळ उघडे पडले. हा प्रकार उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये घडला असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहाजणाची सुटका केली.

अमरोहा जिल्ह्यातील डगरौलीमध्ये हि महिला एक खासगी रुग्णालय चालवते. या महिलेने गुरुवारी (दि.४) सहा जणांनी आपल्यावर गँगरेप केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच गुप्तांगावर जखमा केल्याचे पोलिसांना सांगितले. तक्रार दाखल करताना तिने रुग्णालयाचा भागीदार ऋषिपाल याचे सासरे हुक्म सिंह, मेव्हणा तेजवीर, विष्णु आणि शाहपुर कला येथील अखिलेश यांच्यावर गँगरेपचा आरोप केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य़ ओळखून सहा जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असता पोलिसांनी महिलेवर संशय आला. त्यांनी महिलेची वैद्यकीय चाचणी केली. वैद्यकीय चाचणीच्या अहवाल आल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाले नसल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर महिलेचे पितळ उघडे पडले. पोलिसांनी तिच्याकडे केलेल्या कसून चौकशीत तिने सर्व हकीकत सांगितली. गँगरेपचा प्रकार खरा भासवण्यासाठी तिने सिरींजने रक्त काढून ते रक्त आपल्या कपड्यावर पसरवल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी न्यायालयासमोर महिलेचा जबाब सादर करून ताब्यात घेतलेल्या सर्वांना सोडून दिले. महिलेचे आणि रुग्णालायचा भागीदार ऋषिपाल यांच्यामध्ये जवळीक असून तिने कोणत्यातरी गुन्ह्यात स्वत:ला वाचवण्यासाठी हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि महिला मुळची अलीगढची असून तिच्या पतीचे निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर ती आपल्या दिरासोबत राहत होती. दिरापासून तिला एक मुल झाले असून दिर सध्या एका गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे. दिर तुरुंगात गेल्यानंतर तिने ऋषिपालच्या मदतीने रुग्णालय सुरु केले असून ते दोघे मिळून रुग्णालय चालवतात.

 कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’च्या नाऱ्याचा वापर : अमर्त्य सेन

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ