बिबट्याशी दोन हात करून तिने मृत्यूच्या दाढेतून केली मैत्रिणीची सुटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बिबट्याने मैत्रीणीवर जीवघेणा हल्ला केल्याचे पाहताच एका जिगरबाज महिलेने स्वताच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी दोन हात करून मैत्रिणीची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली. अहमदनगरमधील कामरगाव येथील शेतात ही थरारक घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शालिनी ठोकळ यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात शालिनी जखमी झाल्या आहेत. शालिनी आणि रोहिणी कदम या दोघी शेतात जात असताना दगडामागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे शालिनी यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने शालिनी यांना पाठीचा चावा घेत खाली पाडले.

त्याचवेळेस रोहिणी यासुद्धा घाबरून खाली पडल्या. मात्र रोहिणी यांनी प्रसंगावधान दाखवत हाताला लागलेल्या दगड बिबट्याच्या दिशेने  भिरकावला आणि आरडाओरड सुरू केली. दगडाचा मारा चालू केल्यानंतर बिबट्या घाबरुन तेथून पळाला. शालिनी यांच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे रोहिणी बचावल्या आहेत. शालिनी यांना बिबट्याने कमरेला चावा घेतला असून त्यांच्यावर अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयात चेंगराचेंगरी, ८ विद्यार्थी जखमी

मुंबई : विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयात रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास वार्षिक कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आठ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठ पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे. पाच जणांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मिठीबाई महाविद्यालयातील ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. विलेपार्ले पश्चिम येथील मिठीबाई महाविद्यालयात गुरुवारी संध्याकाळी महाविद्यालयात वार्षिक कार्यक्रम सुरू होता. कॉलेज फेस्टीव्हल निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान चेंगाचेंगरी झाली असून जखमींमध्ये ६ मुले आणि २ तरुणींचा  समावेश आहे. मात्र, याबाबत अद्याप महाविद्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.