पहिल्यांदाच विमानतळावर पोहचलेल्या महिलेनं केलं ‘असं’ काही की ‘बस्स’ !

इस्तंबूल : वृत्तसंस्था – पहिल्यांदाच विमानतळावर जाणाऱ्यांची कधीकधी चांगलीच फजिती होते. अशाच फजितीचा सामना एका महिलेला करावा लागला आहे. विमानतळावर सामान तपासण्यासाठी ‘कन्वेयर बेल्ट’ असतो. या महिलेने कन्वेयर बेल्टला एस्कलेटर समजले आणि ही महिला त्यावर चढली. त्यावर चढल्यामुळे ही महिला जागीच कोसळली. या घटनेचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे.

तुर्कस्तानच्या इस्तंबूल विमान तळावर ही घटना घडली आहे. त्या महिलेला वाटले की, सामानाची देवाण घेवाण करणाऱ्या बेल्टवरून गेल्यास लवकर विमानापर्यंत पोहचेल. पण असे झाले नाही. तिने बेल्टवर चढण्याचा प्रयत्न करताच ती खाली पडली.

फॉक्स मीडियाच्या रिपोर्टनुसार, पहिल्यांदाच विमानतळावर गेलेल्या महिलेचे सामान तपासण्यात आले . तिला वाटले की, सामानाची देवाण घेवाण करणाऱ्या बेल्टवरून गेल्यास लवकर विमानापर्यंत पोहचता येईल या उद्देशाने ती महिला या बेल्टवर स्वार झाली आणि खाली पडली. यानंतर विमानतळाचे कर्मचाऱ्यांनी तिच्या मदतीसाठी धावले आणि तिला जवळच्या खोलीत घेऊन गेले.

Loading...
You might also like