धक्‍कादायक ! एकाच वर्षात काही महिला 4 – 4 वेळा ‘प्रेग्‍नंट’, CBI तपास सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमध्ये कायद्याच्या चिथड्या उडवत महिलांनी मॅटर्निटी सुट्ट्यांचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी या महिलांनी एका वर्षात चार-चार वेळा या योजनेचा लाभ घेतला तर काही जणांनी आठ-आठ वेळा या योजनेचा फायदा घेत सरकारला चुना लावला आहे.

ईएसआय कोर्पोरेशनमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी कंपनीत काम करणाऱ्या काही महिलांनी आठ वेळा तर काहींनी चार वेळा मॅटर्निटी सुट्ट्यांचा फायदा घेत सरकारला मोठ्या प्रमाणात लुटले आहे. त्यामुळे हा घोटाळा इतका मोठा आहे कि, यासाठी सरकारी तपास यंत्रणा सीबीआयला तपास सोपवण्यात आला आहे. त्यासाठी सीबीआयने अनेक ठिकाणी छापे मारले असून या प्रकरणात अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. यामध्ये मोठा घोटाळा करण्यात आला असून यामध्ये एक हजारापेक्षा अधिक महिलांनी अनेक वर्ष या मॅटर्निटी सुट्ट्यांचा फायदा घेतला आहे.

मात्र यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून या सर्व खोट्या महिला दाखवून हा निधी लुटण्यात आला आहे. यातील महिलांची ओळख हि पटवता येणार नसल्यामुळे आता आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान सीबीआयपुढे आहे.

दरम्यान, या प्रकरणात अनेक आरोपींचा सहभाग असून यामध्ये उच्च पदावरील अधिकाऱ्यांपासून ते खाली शिपायापर्यंत या प्रकरणात आरोपी असल्याची माहिती मिळत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –