अरे देवा ! प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी पोरीनं चक्क कुटुंबाला दिल्या झोपेच्या गोळ्या, प्रकृती बिघल्याने ‘गूढ’ उकललं

बरेली : वृत्तसंस्था – प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एका विवाहित महिलेने घरातील लोकांना जेवणातून झोपेच्या गोळ्या खावू घातल्या. मात्र, मुलांची पकृती बिघडली आणि तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्यावर पाणी फिरले. कुटुंबातील लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी महिलेला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. अद्याप त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. हा प्रकरा फत्तेहगंज जिल्ह्यातील एका गावामध्ये घडला आहे.

महिलेचा पती नोकरीनिमित्त हरिद्वार येथे राहतो. तर गावामध्ये त्याची पत्नी, दोन मुलं, आई आणि भाऊ राहतात. दरम्यान महिलेचे आणि त्याच गावात राहणाऱ्या एका तरुणाचे सुत जुळले. त्यांच्यामध्ये भेटीगाठी सुरु झाल्या. हा प्रकार घरात समजल्यानंतर घरच्यांनी तिला घराबाहेर पडण्यास मज्जाव केला. त्यामुळे तिला प्रियकराला भेटता येत नव्हेत. त्यातच तिने प्रियकरासोबत पळून जाण्याचा बेत आखला.

महिलेने जेवण करताना जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या घातल्या. या गोळ्या जास्त प्रमाणात टाकल्याने मध्य रात्री मुलाला उलट्या सुरु झाल्या. घाबरलेल्या महिलेने आरडा ओरडा करून ग्रामस्थांना गोळा केले. ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णवाहिकेला बोलावून घेतले. दरम्यान गावकऱ्यांना तिच्या सासू आणि दिराला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र, ते उठले नसल्याने ग्रामस्थांनी तिची आठ वर्षाची मुलगी आणि सहा वर्षाच्या मुलासह सासू आणि दिराला उपचासाठी रुग्णालयात दाखल केले. मुलाची प्रकृती बिघडल्याने त्याला गावात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. गावातील स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी जेवणामध्ये झोपेच्या गोळ्यांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना त्रास झाल्याचे पोलिसांना सांगितले. तर उपचारासाठी दाखल केलेल्या सासू शुद्धीवर आली त्यावेळी तिने सुनेनेच हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला. सासून पोलिसांना सांगितले की, तिचे आणि गावातील एका तरुणामध्ये प्रेमसंबध आहेत. त्या दोघांना भेटण्यास मज्जाव केल्याने आणि गावकऱ्यांनी तरुणाला या सुनेपासू दूर राहण्यास सांगितल्यापासून ते दोघे भटले नसल्याचे सासूने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी सुनेला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान सुनेने जेवणात झोपेच्या गोळ्या घातल्याची कबुली दिली. मात्र, मुलाची प्रकृती बिघडल्याने घाबल्याने गावकऱ्यांना बोलावून मुलाला आणि इतरांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे सांगितले. ज्यावेळी गावकऱ्यांना बोलावले त्यावेळी प्रियकर घरामध्ये होता. गावकरी जमा झाल्यानंतर तो तेथून पळून गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

फतेगंज पूर्वचे प्रभारी रविकरन सिंह यांनी सांगितले की, महिलेने प्रेम संबंधातून मुलांसह कुटुंबातील इतरांना झोपेच्या गोळ्या दिल्या. वैद्यकीय अहवालात तिने झोपेच्या गोळ्या दिल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रियकराला बोलावून त्याच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसून, तक्रार दाखल करून घेण्यात आली असल्याचे सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त