संतापजनक ! ३ वर्षात एकाच जिल्हयातील ४ हजार ६०५ महिलांचे गर्भायश काढले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, त्यांच्या मंत्रालयाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेच्या बैठकीत एक समिती गठित केली आहे. ज्यात बीड जिल्हातील गर्भाशय काढल्याच्या अनेक प्रकरणांची चौकशी होणार आहे. शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उचलून धरला होता. त्या म्हणाल्या की बीड जिल्हातील ऊसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलांचे गर्भाशय काढण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. महिलांच्या कामात कमी पडू नये आणि दंड भरावा लागू नये. यासाठी महिलांचे गर्भाशय काढण्यात आले आहे. यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की, मागील 3 वर्षात बीड जिल्हात ४ हजार ६०५ महिलांचे गर्भाशय काढण्यात आले आहे.

बीड जिल्हात सिव्हिल सर्जनच्या अध्यक्षतेत बनवण्यात आलेल्या समितीत समोर आले की, अशा प्रकारचे २०१६-१७ आणि २०१८-१९ या काळात ९९ खासगी रुग्णालयात करण्यात आले. त्यांनी सांगितले की ज्या महिलांचे गर्भाशय काढले गेले, त्यातील अनेक ऊसाच्या शेतात काम करणाऱ्या मजदूर नाहीत. मंत्र्यांनी सांगितले की जिल्हात नैसर्गिक पद्धतीने बाळंतीन होण्याची संख्या सीजेरियन पद्धतीने होणाऱ्या संख्येपेक्षा आधिक आहे.

राज्य सरकारने डॉक्टरांना आदेश –

राज्य सरकारने डॉक्टरांना आदेश दिले आहेत की गरज नसताना गर्भाशय काढण्यात येई नयेत. राष्ट्रीय महिला आयोगाने हे प्रकरण प्रकाशात आल्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांना एक सूचना जारी केली होती.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन