Women Health | गर्भपातानंतर येणारी ‘मासिक पाळी’ किती दिवस सुरू राहते?; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – Women Health | गर्भपात (Abortion) झाल्यानंतर येणाऱ्या पिरीयड्सबाबत (Menstrual Period) अनेक महिला चिंतेत पडलेल्या असतात. गर्भापातानंतर मासिक पाळीमध्ये जादा रक्तस्त्राव (Bleeding) होईल यामुळे बहुतांश स्त्रियांना काळजी लागून असते. गर्भापात झाल्यानंतर महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. दरम्यान, गर्भपातानंतर अधिक रक्तस्त्राव झाल्याने महिलेला पोटाच्या खालच्या भागामध्ये अधिक वेदना होण्याची शक्यता असते. मात्र गर्भपातानंतर येणारी ‘मासिक पाळी’ किती दिवस (Women Health) सुरू राहते, याबाबत माहिती समोर आली आहे. याबाबत जाणून घ्या.

 

इतक्या दिवस मासिक पाळी सुरु असते (Menstruation Start This Much Days) –

गर्भपातानंतर येणाऱ्या मासिक पाळीचा काळ प्रत्येकासाठी निराळा असू शकतो. दरम्यान, 4 ते 7 दिवसांत पिरीयड्स निघून जाण्याची शक्यता असते. पण, याची अचूक वेळ निश्चित करणे कठीण आहे. प्रत्येक महिलेच्या परिस्थितीत याचा काळ वेगळा असू शकतो. (Women Health)

 

गर्भपातानंतर इतक्या दिवसांनी मासिक पाळी येते (Menstruation Occurs This Much Days After An Abortion) –

वैद्यकीय गर्भपातानंतर सामान्य पिरियड्स (Normal Periods) सुरू होण्याची कोणतीही निश्चित वेळ नाही. गर्भपातानंतर 4 ते 8 आठवड्यादरम्यान कधीही मासिक पाळी सुरू होऊ शकते.

या दरम्यान, गर्भपात शस्त्रक्रियेने झाला असेल तर पिरीयड्स येण्यास 4 ते 6 आठवडे लागू शकतात. गर्भधारणेप्रमाणे गर्भपाताचा टप्पा प्रत्येक महिलेसाठी सारखा नसतो. अशा परिस्थितीमध्ये आठ आठवड्यांनंतर देखील पिरीयड्स सामान्यपणे येत नसेल तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेणे महत्वाचे आहे. दरम्यान, जर गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत गर्भपात झाल्यास 4 ते 8 आठवड्यात मासिक पाळी येण्याची शक्यता अधिक असते (Women Health).

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Women Health | how many days does the menstrual period after abortion last know in details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा