धक्कादायक ! भररस्त्यात तिघांनी केला ‘रेप’, मदतीला होत्या 2 महिला

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला मारहाण करून तिच्यावर गँगरेप केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये दोन महिला सहभागी होत्या. ही घटना न्यूयॉर्क शहराच्या जवळ असलेल्या ओलिनविलेमध्ये घडली. पीडित महिलेवर तिघांनी गँगरेप केला असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला 36 वर्षाची असून तिला चार पुरुष आणि दोन महिलांनी जबरदस्तीने पकडून एका अपार्टमेंटमधील घरात घेऊन गेले. त्यानंतर तिला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून गुरुवारी दुपारी तिच्या गँगरेप केला. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण, हल्ला, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पीडित महिला रस्त्यावरून जात असताना तिचे अपहरण करण्यात आले. तिला एका अपर्टमेंटमधील घरात नेण्यात आले. त्या ठिकाणी तिच्यावर तिघांनी गँगरेप केला. त्यावेळी दोन महिला आणि एका पुरुषाने पीडितेला पकडून ठेवले होते.

या खळबळजनक प्रकारानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन तीन पुरुष आणि दोन महिलांना अटक केली आहे. तर त्यांच्या इतर साथिदारांचा शोध सुरु असून त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींनी तिला बेदम मारहाण केली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. एका आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवून कपडे काढण्यास सांगितले होते. तिने नकार दिल्यानंतर त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी तिच्यावर अत्याचर केल्यानंतर तिने आपली सुटका करुन घेत पोलीस ठाणे गाठले.

visit : Policenama.com

You might also like