भारतात महिला विवाहित असूनही ‘बाहेर’ घेत आहेत प्रेमाचा शोध – रिपोर्ट

नवी दिल्ली : व्यभिचार भारतात नेहमीच एक कायदेशीर आणि नैतिक विषय ठरला आहे, परंतु नियम नेहमी पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे राहिले आहेत. काही काळापूर्वी तर भारतात पुरुष आपल्या पत्नीने दुसर्‍या पुरुषाशी संबंध ठेवल्याबद्दल पुरुष आणि महिलेवर खटला दाखल करू शकत होते, अ‍ॅडल्ट्री कायदा संपल्यानंतर आता असे होऊ शकत नाही. अलिकडेच झालेल्या एका सर्वेक्षणात आढळले आहे की, भारतात जास्त महिला विवाहाच्या नंतर सुद्धा बाहेर रिलेशनशिप ठेवत आहेत आणि त्यांच्यापैकी बहुतांश माता होत्या.

फ्रान्सचे एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अ‍ॅप ’ग्लीडेन’ (Gleeden) द्वारे एक सर्वे सुरू करण्यात आला होता, हे अ‍ॅप एका महिलेने महिलांसाठी विकसित केले आहे. हे अ‍ॅप महिलांसाठी, विशेष करून त्या लोकांसाठी बनवले गेले आहे जे आपल्या पहिल्या विवाहात आनंदी नाहीत आणि बाहेर आनंद, प्रेम, फ्रेंडशिप, सेक्स, चा शोध घेत आहेत. या अ‍ॅपचे सध्या भारतात 13 लाख यूजर्स आहेत.

हे सर्वेक्षण संपूर्ण भारतात 30-60 वयोगटातील शहरी, शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र महिलांचा दृष्टिकोण दर्शवत आहे, या सर्वेमध्ये 48 टक्के भारतीय महिला विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या आढळल्या, त्या केवळ विवाहितच नव्हत्या तर त्यांना मुले सुद्धा होती. द न्यू इंडियन एक्सप्रेसद्वारे प्रकाशित सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार 64 टक्के महिला ज्या विवाहानंतर सेक्सची कमतरता किंवा आपल्या पार्टनरकडून सॅटिसफाईड न होत असल्याने एक्स्ट्रा मॅरीटल अफेयरमध्ये गुंतल्याचे आढळल्या.

रिपोर्टनुसार विवाहाच्या बाहेर प्रेमाचा शोध घेत असलेल्या 76 टक्के महिला शिक्षित होत्या, तर 72 टक्के आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत्या. पश्चिमेत महिलांमध्ये वाढती व्यभिचारी प्रवृत्ती दिसते. नव्या अभ्यासातून समजले आहे की, महिला विवाहबाह्य संबंधात गुंतत आहेत. दाम्पत्य चिकित्सक टॅमी नेल्सन, ’व्हेन यू आर द वन हू चीट्स’ चे लेखक, म्हणतात की, महिला न केवळ जास्त फसवणूक करू शकतात, तर याची प्रत्येक वेळी हद्द पार करू शकतात.

2020 मध्ये ग्लीडेनच्या एका सर्वेक्षणात भारतात जवळपास 55 टक्के विवाहित लोकांनी ही गोष्ट स्वीकारली की त्यांनी आपल्या जोडीदाराला फसवले. या सर्वेक्षणात 56 टक्के महिला होत्या. हा अभ्यास 25 आणि 50 च्या वयोगटात 1,525 विवाहित भारतीयांमध्ये करण्यात आला होता, ज्यामध्ये आढळले की, त्यांच्यापैकी 48 टक्के महिलांचे म्हणणे होते की, एकाचवेळी एकापेक्षा जास्त लोकांसोबत प्रेम होणे शक्य आहे. मात्र, या आकड्यांवरून समजते की, विवाहित महिलांमध्ये व्यभिचार वाढत आहे, इतर अभ्यासातून समजते की, संख्येतील परिवर्तन व्यभिचाराकडे आणि पितृसत्तात्मक दृष्टिकोणमध्ये बदल दर्शवू शकतो.

पुरूष सुद्धा जास्त व्यभिचारी असतात, परंतु भारतीय संस्कृतीमध्ये महिलांसाठी व्यभिचार पूर्णपणे वर्ज्य मानला जात होता. उदाहरणार्थ, भारतात नुकतेच डिक्रिमाइज्ड आणि एकदम विचित्र अडल्ट्री कायद्यावर प्रतिबंध लावला गेला, ज्यानंतर कुणीही महिला किंवा पुरुष आपल्या पार्टनरविरूद्ध खटला दाखल करू शकत नाही. अडल्ट्री कायदा हा एक कायदेशीर अपराध न होता नागरिक गुन्हा बनला आहे जो घटस्फोटाचा आधार बनू शकतो.

अशाप्रकारे कायद्यातील बदलामुळे दृष्टिकोणात बदल झाला आहे, ज्यानंतर महिलांमध्ये कामुकता आणि आपल्या स्वत:च्या शरीराबाबत जागृतता वाढली आहे, ज्याच्या परिणाम म्हणून, व्यभिचाराबाबत लोकांचा विचार बदलत आहे. महिलांना आता त्यांचे पती आपली संपत्ती समजत नाहीत. विशेषाधिकार मिळालेल्या महिलांनी सुद्धा विवाहात समानतेचा दावा करण्यास सुरूवात केली आहे.

खरं तर, खरा प्रश्न हा नाही की, महिला जास्त फसवणूक करत आहेत की नाही, परंतु विवाहात युगुलाने फसवण्याची आवश्यकता काय आहे? पुरुष जगभरात महिलांच्या तुलनेत जास्त व्यभिचार करतात आणि तरी सुद्धा त्यांचा वयोगट किंवा त्यांच्या पालकत्व स्थितीच्या बाबत कोणताही प्रश्न उपस्थित केला जात नाही. ग्लीडेनद्वारे करण्यात आलेल्या अशा अभ्यासावर प्रश्न उपस्थित केले पाहिजे, हेच कारण आहे की, विवाहानंतर संबंध ठेवणार्‍या महिला असे करतात, कारण लैंगिक आणि भावनिक पूर्ततेसाठी मागणी करणे एका विवाहात दोन्ही पक्षांना समान अधिकार आहे.