Women Intimate Health | महिलांनो ‘इंटिमेट’ हेल्थकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ पध्दतीनं घ्या खास काळजी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Women Intimate Health | पावसाळा असो वा हिवाळा महिलांनी त्यांच्या इंटिमेट आरोग्याची (Women Intimate Health) काळजी घेणे फार महत्वाचे आहे. बरेच जण इतके आळशी होतात की थंडीमुळे किंवा आळशीपणामुळे ते आंघोळ करत नाहीत. इतकेच नव्हे तर काही व्यक्ती बर्‍याच दिवसांपासून एकच अंडरवियर परिधान करतात, परंतु याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जर आपण बरेच दिवस आळशीपणामुळे आपली अंडरगारर्मेंट बदलली नाहीत तर आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्यावर त्याचा काय दुष्परिणाम होतो आणि स्वत: ला सुरक्षित कसे ठेवता येईल ते जाणून घ्या.

1) अंडरगारमेंट्स न बदलल्यामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका
दीर्घकाळ आपल्या अंडरगारमेंट्स न बदलण्याने इंटिमेट आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. बर्‍याच काळासाठी त्याच अंडरगारमेंट्स परिधान केल्याने बॅक्टेरिया किंवा यीस्टचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

2) इंटिमेट क्षेत्रात दुर्गंधी आणि जळजळची समस्या…
यामुळे, इंटिमेटच्या भागात वास येऊ लागतो, जो आपल्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतो. या व्यतिरिक्त, इंटिमेट भागात जळजळ देखील होऊ शकते.

3) पुरळाची समस्या
दररोज अंडरवियर न बदलल्यामुळे घाम आणि दुर्गंधीमुळे आजूबाजूला लाल पुरळ दिसून येतात. कधीकधी त्यामधून रक्तही येऊ लागते. यासाठी आपण आपले इंटिमेट नेहमीच स्वच्छ आणि कोरडे ठेवणे महत्वाचे आहे.

कशाप्रकारे स्वच्छतेची काळजी घ्यावी जाणून घ्या…

1) दिवसातून दोनदा कोमट पाण्याने स्वच्छ करा.

2) आरामदायक कपड्यांमध्ये घरात काम करा.

3) हा भाग क्षेत्र अत्यंत संवेदनशील आहे, म्हणून येथे साबण वापरू नका, नेहमी सौम्य उत्पादनांनी स्वच्छ करा.

4) आरोग्यासाठी नेहमी स्वच्छ अंडरवियर घाला आणि दररोज हे बदला.

5) मासिक पाळी दरम्यान प्रत्येक ४ ते ५ तासांच्या कालावधीत सॅनिटरी पॅड बदला, यामुळे संसर्ग होणार नाही.

Web Titel :- Women Intimate Health

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ ! FB पोस्ट टाकत पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या

Pune Crime | मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून; पुणे स्टेशन परिसरातील घटना, प्रचंड खळबळ