पती आणि २ प्रियकरांच्या मदतीने तिने काढला प्रियकराचा काटा

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – पती आणि २ प्रियकरांच्या मदतीन प्रेयसीने एका प्रियकराचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकिस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. नितीन रामा साबळे असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर संतोष सकट उर्फ सागर शेख आणि गुलशन शेख यांना अटक कऱण्यात आली आहे.

बीड नगर रोडवर धामणगाव येथे २५ एप्रिल रोजी एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर पोलिसांन खुनाचा उलगडा केला.

गुलशन शेख असे प्रेयसीचे नाव आहे. तिने गेल्या दोन महिन्यांपुर्वी संतोष सकट याच्यासोबत लग्न केले होते. तिचे इतर दोघांसोबतही प्रेमसंबंध जुळले होते. त्यातच १५ दिवसांपुर्वी ती नितीनसोबत फिरायला गेली होती. त्यानंतर ही बाब इतरांना खटकली. त्यामुळे त्यांनी नितीनला समजावून सांगितले परंतु तो ऐकत नव्हता.त्यामुळे गुलशन आणि तिचा पती व तिच्या प्रियकराने मिळून नितीनचा खून केला.

Loading...
You might also like