माता लक्ष्मीच्या कृपेसाठी महिलांनी ‘या’ 5 वस्तूंपैकी एक वस्तू पर्समध्ये ठेवावी

पोलीसनामा ऑनलाइन – धन मिळवण्याची इच्छा प्रत्येक व्यक्तीची असते. प्रत्येकाला वाटते की आपल्याकडे एवढे धन असावे की, आयुष्य आरामात जावे. परंतु आपल्या जवळपास काही लोक असेही असतात, ज्यांच्याजवळ पैसे जास्त काळ टिकत नाहीत. अशा लोकांची पर्स सकाळी भरलेली असते, पण सायंकाळ होताच रिकामी होते. ही समस्या दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय दिले आहेत, ज्यामुळे तुमच्या जवळ असलेला पैसा टिकून राहिल आणि पर्स कधीही रिकामी होणार नाही.

1 लक्ष्मी मातेचा फोटो
तुमच्या पर्समध्ये लक्ष्मी मातेचा फोटो ठेवा, ज्यामध्ये माता नाण्यांमध्ये बसलेली असेल. असे केल्याने कधीही तुमची पर्स रिकामी होणार नाही.

2 सोने किंवा चांदीचे नाणे
सोने किंवा चांदीचे नाणे पर्समध्ये ठेवल्याने धनलाभ होतो. सोने किंवा चांदीचे नाणे पर्समध्ये ठेवण्यापूर्वी ते प्रथम लक्ष्मी मातेच्या चरणावर ठेवा.

3 काचेचा तुकडा
धर्म शास्त्रानुसार पर्समध्ये काचेचा तुकडा ठेवला पाहिजे. हा उपाय धनवृद्धीसाठी सहायक ठरतो. यामुळे धनलाभ होतो आणि अडकलेले पैसेसुद्धा परत मिळतात.

4 तांदुळ
धार्मिक शास्त्रानुसार पर्समध्ये चिमुटभर तांदुळ ठेवल्याने अनावश्यक खर्च कमी होतात आणि धनवृद्धी होऊ लागते.

5 लाल रंगाचा कागद
एका लाल रंगाच्या कागदात तुमची इच्छा लिहून तो रेशमी धाग्याने बांधून पर्समध्ये ठेवा. हा उपाय केल्याने पर्स नेहमी भरलेली राहते.

You might also like