कोट्यावधी रुपायांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी महिला नायब तहसीलदाराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमीनींचे बेकायदेशीरपणे हस्तांतण करत फसवणूक केल्या प्रकऱणी नायब तहसिलदार गितांजली नामदेवराव गरड यांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. त्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग निश्चित झाल्यानंतर त्यांना समर्थ पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी हडप करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याच्या कार्यालयातील लिपीक चंद्रशेखर ढवळे बनावट आदेश तयार केले. ते आदेश बनावट असल्याचे माहित असूनही ते खरे आहेत अशे भासविण्यात आले. त्यानंतर सुभाष कारभारी नळकांडे (बुंरुजवाडी, ताशिरुर) याने त्याचा वापर केला व त्या आदेशावरून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या नावे शिरुर तहसील कार्यालयातील पुनर्वसन लिपीक रमेश वाल्मिकी याने खोटे अर्ज तयार केले. त्यावर कारवाईचे अधिकार नसताना तहसिलदार यांच्या अपरोक्ष तत्कालीन नायब तहसीलदार गरड यांनी त्यांचे शेरे घेतले. त्या नोंदी तत्कालीन मंडल अधिकारी बळीराम खंडूजी कड याने ते न तपासता प्रमाणित केले. त्यानंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा खोटा अर्ज तयार करून त्यांनी शासन प्रदान जमीनींचा भोगवटा वर्ग बदलण्यासाठीचे अधिकार उपजिल्हाधिकारी किंवा वरिष्ठांना असताना ते शिरूर तहसील कार्यालयात दाखल कऱण्यात आले. त्यावर गरड यांनी शेरे मारले. त्याआधारे शासकिय जमीनीचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या नावे झालेल्या जमीनींचे भोगवटा वर्ग बदलाचे गावकामगार तलाठी कासारी काळे याने फेरफार रजिस्टरी नोंद केले. त्या नोंदी तत्कालीन मंडल अधिकारी क़ड याने कोणत्याचाही बाबींची पडताळणी न करता त्याकडे हेतूत: दूर्लक्ष केले.

त्यामुळे शासकिय जमीनींचे हस्तांतरण झाल्यानंतर त्यांचा भोगवटा वर्ग बदलला गेल्याने त्या जमीनींच्या विक्रीचे असलेले शासकिय निर्बंध बनावट आदेशाच्या आधारे डावलले गेले. त्यामुळे अशा जमीनी पुन्हा सर्वसामान्यांना विकल्या गेल्या. त्यामुळे शासनाची व सर्वसामान्यांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत तपासात अशी अनेक प्रकऱणे समोर आली असून ६० एकरपेक्षा अधिक शासकिय जमीनीचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण झाले आहे.  या जमीनींची किंमत कोट्यवधी रुपये आहे.या प्रकरणात कोणत्या शेतकऱ्याची फसवणूक झाली असेल तर त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केली आहे.

गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस सह आयुक्त शिवाजी बोडके, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त सहास बावचे, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेश बेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे हे करीत आहेत.