काय सांगता ! होय, बीड जिल्ह्यातील महिला तब्बल 21 वेळा ‘गर्भवती’, मात्र अर्भक…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही कधी 20 पेक्षा जास्त वेळा गर्भवती राहिलेल्या महिला असं कधी ऐकलं आहे. परंतु असं सत्यात झालं आहे आणि ते ही आपल्या महाराष्ट्रात. लंकाबाई खरात या 20 वेळा गर्भवती राहिल्या आहेत. आता त्या 21 व्या वेळी गर्भवती होत्या मात्र प्रस्तुती झाल्यानंतर स्त्री जातीचे नवजात अर्भकाचा मृत्यू होत होता. लंकाबाई माजलगाव सोडून ऊस तोडणीसाठी कर्नाटकात गेल्या, तेथेच त्यांची तीन दिवसांपूर्वी प्रसुती झाली. परंतु गर्भाशयाची काळजी न घेतली गेल्याने नवजाब स्त्री जातीच्या अर्भकांचा मृत्यू झाला. लंकाबाई भंगार वेचण्याचे काम करतात. तर त्यांचे पती गाणे गाऊन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात.

कुटूंब कल्याण शस्त्रक्रियेबाबत माहिती नसल्याने आणि त्याबाबात भीती असल्याने लंकाबाई यांनी ही शस्त्रक्रिया करुन घेतली नाही. त्यामुळे त्यांची 20 वेळा गर्भवती राहिल्या. ही बातमी प्रशासनासमोर पोहचली तरी प्रशासनाने फक्त घेण्यापलीकडे काहीच केले नाही.

लंकाबाई तीन महिन्यापूर्वी आपल्या कुटूंबासह कर्नाटकात ऊस तोडणीसाठी गेल्या होत्या. मागील तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रसुती झाली, मात्र काळजी न घेतल्याने नवजात स्त्री अर्भकाचा मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्त्या सत्यभाभा सौंदरमल यांनी आरोग्य विभागावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप लावला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/