देशाचे अर्थकारण पुढे नेण्यासाठी महिलांनी पुर्ण शिक्षित असणे गरजेचे : जेजुरीचे API अंकुश माने

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन ( मोहंम्मदगौस आतार) – ग्रामीण भागातील महिलां पुर्ण शिक्षित नसल्यामुळे त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नसते त्यामुळे त्या पुर्णपणे सक्षम नाहीत. महिलांना स्वतःमध्ये आत्मविश्वास असला तर त्या घरबसल्या इलेक्ट्रॉनिक मिडिया मार्फत अँँनड्राईड मोबाईल , इंटरनेट सहज वापरू शकतील . देशाचे अर्थकारण पुढे नेण्यासाठी महिलांनी पुर्ण शिक्षित असणे गरजेचे आहे.

जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी केले.
नीरा ( ता. पुरंदर ) येथे मंगळवारी ( दि.१७) यश एज्युकेशन सोसायटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य महिला आयोग द्वारा आयोजित डिजिटल प्रशिक्षण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने व अन्य मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंकुश माने बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या तज्ञ मार्गदर्शिका स्वाती घैसास , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ननवरे, पत्रकार राहुल शिंदे, मोहंम्मदगौस आतार, भरत निगडे , अमीर शेख यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

माने पुढे म्हणाले कि, भारतातील महिलांना कुटुंबात समानतेचा हक्क मिळत नसल्यामुळे महिला मागे असल्याचे पहावयास मिळत आहे. आत्मविश्वास असेल तर महिलांमधील असलेली स्त्रीला वाव मिळेल. महिलांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे नीरा सारख्या ग्रामीण भागात यश एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्था प्रशिक्षण देत असल्याने महिलां शिक्षित होण्यास मदत होत आहे. इंटरनेटच्या ज्ञानामुळे महिला जगातील माहिती सहज आत्मसात करू शकतील. तसेच त्यांना शासनाच्या उद्योग धंद्याच्या योजनांची देखील माहिती मिळत असल्यामुळे त्याचा त्यांना फायदा होत आहे. महिलांनी आपल्यामधील असलेल्या एखाद्या गोष्टीचे ज्ञान आपल्या सहकारी महिलांना निर्मळ मनाने दिल्यास महिला सक्षम होण्यास मदत होईल.

राज्य महिला आयोगाच्या तज्ञ मार्गदर्शिका स्वाती घैसास यांनी ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल युगात आत्मविश्वासाने वावरण्याकरिता आवश्यक असलेले सर्व डिजिटल प्रशिक्षण व आपले सरकार, नमो, उमंग, डीजी लाँकर, भिम, ७/१२ महाराष्ट्र, ई – गेम , तेजस्विनी अशा विविध अँँपचा वापर प्रत्यक्ष प्रक्टिकलद्वारा माहिती देऊन प्रशिक्षण दिले . यावेळी जवळपास १०० महिलांनी प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला .

प्रास्ताविक यश एज्युकेशन सोसायटीच्या कायदेशीर सल्लागार अँँड. हेमलता जगदाळे यांनी केले. सुत्रसंचालन मोहिनी भिसे यांनी केले तर आभार यश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश जगदाळे यांनी मानले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/