नागरिकांच्या मदतीला महिला पोलीस सरसावल्या

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

आज सकाळी साडे दहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील मुठा कालवा दांडेकर पुलाजवळ फुटला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. काही मिनिटातच सिंहगड रस्ता गुडघाभर पाण्याने भरुन गेला. सिंहगड रस्त्याच्या बाजूला असलेल्या जनता वसाहतीत कालव्याचे पाणी शिरले. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. लाखो लीटर पाणी प्रचंड वेगाने झोपड्यांमध्ये घुसले त्यामुळे अनेकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले होते.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be38fbfc-c25e-11e8-9d29-edf9b4633eb1′]
अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक वृद्ध, लहान मुले आडकून पडले. त्यावेळी धावून आले पुणे पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी लहान मुलांना आपल्या पाठीवर बसवून गुडघाभर पाण्यातून वाट काढत सुरक्षितस्थळी हलवले. तसेच कुटुंबाला धिर देण्याचा प्रयत्न केला.खडकवासला कालव्याला गुरूवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दांडेकर पूलाजवळ भगदाड पडले. त्यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या ठिकाणच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घरामध्ये अडकलेल्या लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर काढून सुरक्षितस्थळी नेण्यात आले. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी सगळेच झटत होते. महिला पोलिसांनी तर लहान मुलांना आपल्या पाठिवर बसवून दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. अनेक ज्येष्ठ महिलांनाही आधार देत बाहेर काढण्यात आले.

महिला पोलीस तात्काळ मदतीला धावून आल्याने लहान मुलांच्या पालकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, लांबच लांब लागलेल्या रांगा कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनीही मोठी कसरत केल्याचे दिसून आले.

रात्रीचे घरामध्ये पाणी शिरले असते तर…

पुण्यातील दांडेकर पूल येथे आज (गुरुवारी) सकाळच्या सुमारास मुठा कालव्याच्या भिंतीला भगदाड पडून २०० हून अधिक घरांचे नुकसान झाले असून ४० घरे पाण्यात वाहून गेली आहेत. तर डोळ्यांसमोर संसार वाहून गेल्याने येथील नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश पाहण्यास मिळत आहे. हीच घटना जर रात्रीच्या सुमारास घडली असती आणि घरामध्ये पाणी शिरलं असतं. तर या वस्तीमधील एकही व्यक्ती वाचला नसता, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

[amazon_link asins=’B00FRCNR6U,B073JYDK7P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b745cf46-c25e-11e8-a64a-f3160df96bc6′]