‘त्या’ स्मार्ट महिला पोलिस अधिकार्‍याला ‘Tik Tok’ व्हिडिओ करणं पडलं महागात, निलंबनाची कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका महिला पोलिसाला टिक-टॉक व्हिडिओ तयार करणे महागात पडले आहे. हा प्रकार गुजरातमध्ये घडला. एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांने पोलीस ठाण्यात टिक-टॉक व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबनाला सामोरे जावे लागले आहे.

या महिला पोलीस असलेल्या अर्पिता चौधरी यांनी पोलीस ठाण्यात आपला टिक-टॉक व्हिडिओ शूट केला. मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज पोलीस ठाण्यात त्या कार्यरत आहेत. पोलीस ठाण्यातच त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही महिला पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात असलेल्या तुरुंगाच्या समोर ती बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना व्हिडिओत दिसत आहे.

या महिलेकडून हा व्हिडिओ २० जुलैला पोलीस ठाण्यात सिव्हिल ड्रेसमध्ये शूट करण्यात आला आहे. यानंतर हा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला. सध्या टिक-टाॅकच्या माध्यमातून असे अनेक प्रकार समोर येत आहेत. मागील आठवड्यात देखील एक सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बस चालकाला निलंबित करण्यात आले आहे. हा व्हिडिओ देखील वेगाने व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त