दारु पिऊन पोलिसाचा धिंगाणा, महिला सहकार्याला शिवीगाळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – दिघी येथील पोलीस ठाण्यात दारू पिऊन आलेल्या पोलिसाने महिला पोलिसाला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. मारुती हरिभाऊ बढेकर असे या पोलीस हवालदाराचे नाव असून या प्रकरणी महिने दिघी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी महिला ही शुक्रवारी अंमलदार म्हणून ड्युटीवर होते. तर आरोपीला चऱ्होली या ठिकाणी गस्त घालण्याची ड्युटी देण्यात आली होती. त्या दिवशी आरोपी हा ड्युटीवर जाण्याच्या ऐवजी दारू पिऊन पोलीस ठाण्यात आला आणि त्याने फिर्यादी महिलेबरोबर बाचाबाची करून शिवीगाळ केली. तसेच तुला कोरोना होईल असे अश्लील शब्द वापरून त्याने धिंगाणा घातला. हा प्रकार सुमारे दोन ते तीन तास  सुरु होता. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like