पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना गंडवल!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवस रात्र फसवणुकीचे गुन्हे शोधून आरोपींना पकडणा-या पोलीस (Police) कर्मचाऱ्यांनाच एका महाठगाने फसवल्याचं उघडकीस आले आहे. पोलीस अधिकारी असल्याचे सांगत चक्क महिला पोलिसांनाच लुटणाऱ्या आरोपीला ( women-police-officers-cheated-by-fraud-police-officers) कळंबोली पोलिसांनी अटक केले आहे. नवी मुंबईतील हे प्रकरण असून यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिलिंद देशमुख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने आपले बनावट फेसबुक पेज ओपन केले होते. गणेश मोरे या बनावट नावाने फेसबुक वरून आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगत तो महिला पोलीसांना फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असे. पोलीसांचा गणवेशही त्याने फोटात टाकला होता. बोलण्यात चतुर असलेल्या मिलिंदने फेसबुकच्या माध्यमातून अनेक महिला कर्मचाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढले होते. या पोलीस कर्मचाऱ्यांनाही तो अधिकारीच आहे अस वाटत होत. मैत्री केल्यानंतर तो विविध कारणाने पैशांची गरज असल्याचे भासवून समोरच्या महिला पोलीसांकडून पैसे उकळत असत. वारंवार तो पैसे मागत असल्याने मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी अधिक माहिती काढली असता आपल्या मैत्रिणीलाही त्याने असेच फसविल्याचे समजले.

अखेर सापळा रचून कल्याण वरून या बनावट पोलीस अधिकाऱ्याचा अटक करण्यात आली. पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात फसवणूकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.