Women Should Do These Things Before 30 | 30 वर्षाच्या वयापूर्वी महिलांनी अवश्य करावीत ‘ही’ 10 कामे; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Women Should Do These Things Before 30 | घर, कुटुंब आणि कामाच्या जबाबदार्‍यांमुळे महिलांना स्वत:ची काळजी घेता येत नाही. इतरांची काळजी घेण्यात महिलांचा सगळा वेळ असाच जातो आणि स्वत:साठी काही करण्याचा विचार केला की शरीरात उर्जा (Energy) उरत नाही. महिलांना या गोष्टींची जाणीव तेव्हा होते जेव्हा त्यांचे वय वाढू लागते (Women Should Do These Things Before 30).

 

आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या महिलांनी वयाच्या 30 वर्षापूर्वी कराव्यात. 30 च्या आधी या गोष्टी केल्याने (Women Should Do These Things Before 30) तुम्हाला नंतर कोणतीही समस्या येणार नाही. या कामांबद्दल जाणून घेऊया-

 

1. भीतीवर करा मात (Overcome Fear) –
प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती (Fear) असते. कुणाला उंचीची, कुणाला पाण्याची तर कुणाला भूताची. अनेकदा स्त्रिया उंदीर, झुरळ किंवा पाल यांना खूप घाबरतात. अशा स्थितीत भीतीवर मात करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुमच्यात आत्मविश्वासाचा (Confidence) संचार होईल.

 

2. आपल्या कष्टाच्या पैशाने खरेदी करा काहीतरी (Buy Something With Your Hard Earned Money) –
आजच्या काळात स्त्रिया पुरुषांच्या खूप पुढे गेल्या आहेत. महिलांसाठी नोकरी मिळणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या कष्टाच्या पैशातून काहीतरी विकत घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या मनातील आत्मविश्वास वाढेल.

 

3. प्रेम करा (Make Love) –
स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाला प्रेमाची (Love) गरज असते. प्रेमाशिवाय जगात कोणताही माणूस जगू शकत नाही. अशा स्थितीत लग्नाआधी तुम्ही मनमोकळेपणाने प्रेम करणे आणि तुम्हाला आवडेल ते काम करणे महत्त्वाचे आहे.

4. साहस करा (Courage)-
जीवन सुरळीत चालण्यासाठी जीवनातील साहस खूप महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत महिलांनी काही साहसी काम करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला आव्हान स्वीकारण्याचे धैर्य मिळेल आणि काही गोष्टींबद्दलची भीती संपेल.

 

5. सोलो ट्रिपला जा (Go On A Solo Trip) –
त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी आयुष्यात एकदा तरी एकट्याने सहलीला जाणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही देशात किंवा परदेशात कुठेही जाऊ शकता. प्रत्येकजण जोडीदारासोबत फिरतो, पण एकट्याने किंवा मित्रांसोबत प्रवास केल्याने क्षण संस्मरणीय होतील.

 

6. काहीतरी नवीन शिका (Learn Something New) –
माणसाने कोणत्याही वयात शिकणे थांबवू नये. शिकण्यासाठी वय नसते. अशा स्थितीत महिलांनी दररोज काहीतरी नवीन शिकणे महत्त्वाचे आहे.

 

7. बॉडीवर बाळगा गर्व (Be Proud) –
अनेकदा स्त्रिया स्वतःच्या शरीराची इतरांच्या शरीराशी तुलना करू लागतात. त्यामुळे हळूहळू स्वताचा तिरस्कार करू लागतात. अशावेळी तुम्ही जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करणे महत्त्वाचे आहे. इतरांशी स्वतःची तुलना करू नका.

 

8. सेल्फ सिक्युरिटी (Self Security) –
आपण कोणत्याही वाईट स्थितीत सापडलो की कोणीतरी आपल्याला वाचवायला येईल, हे शक्य नाही.
अशावेळी महिलांनी स्वसंरक्षणासाठी पुढे येणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला ज्युडो (Judo), कराटे (Karate) इत्यादी शिकणे खूप गरजेचे आहे.
यामुळे तुम्हाला स्वतःचे संरक्षण (Self-defense) करण्यासाठी इतरांची गरज भासणार नाही.

 

9. मी टाइम आहे आवश्यक (Me Time) –
अनेकदा स्त्रिया घर, कुटुंब, मुलं आणि ऑफिसच्या कामात इतक्या व्यस्त होतात की त्यांना स्वतःसाठी वेळच नसतो.
अशा स्थितीत तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी थोडा वेळ स्वत:साठी काढणे महत्त्वाचे आहे.
या दरम्यान तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्याबद्दलच विचार करा.

10. एखादी नवीन भाषा शिका (Learn New Language) –
जेव्हा तुम्हाला एकाच वेळी अनेक भाषांचे ज्ञान होते, तेव्हा तुमचे व्यक्तिमत्त्व उजळते. अनेक भाषा शिकल्याने व्यावसायिक दृष्ट्या मदत होतेच,
शिवाय तुमचा आत्मविश्वासही वाढतो.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Women Should Do These Things Before 30 | women self care should do these things 30 me time solo trip self defence learning new language

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘एकच वादा अजित दादा’ ! पुण्यात उद्घाटनांचा धुमधडाका, एकाच दिवशी 19 कार्यक्रम अन् 27 उद्घाटन

 

Chitra Wagh | ‘एकटा देवेंद्र काय करणार विचारणार्‍यांना पुन्हा एकदा करारा जवाब’ – चित्रा वाघ

 

Side Effects Tomatoes | टमाट्याचे दुष्परिणाम ! जास्त प्रमाणात टमाटे खाल्ल्याने होऊ शकतात 5 प्रकारचे आजार