काय सांगता ! होय, ‘कोरोना’ला पिटाळून लावण्यासाठी ‘या’ महिलांनी गायलं भजन (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने भारतातून जाण्यासाठी महिलांनी भजन गायले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की महिला भजन गात आहेत. कोरोना भाग जा, भारत में तेरा क्या काम, कोरोना भाग जा. 4 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की महिला मोबाइलमध्ये पाहून हे भजन गात आहेत.

या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 1.2 मिलियन पेक्षा जास्तवेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. तसेच 22 हजार पेक्षा जास्त वेळा शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

एका युजरने लिहिले, कोणी या गीतांचे बोल सांगू शकेल काय? तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की गाणं ऐकून कोरोनाने देखील आता निर्णय घेतला असेल की आता जग सोडण्याची वेळ आली. एका दुसऱ्या युजरने लिहिले, खूपच चांगले गाणे तयार केले, कदाचित हे गाणे ऐकून कोरोना पळून जाईल.

कोरोनाचे पहिला रुग्ण चीनमध्ये आढळला होता परंतु आता संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे. भारतात कोविड 19 चे आतापर्यंत 62 रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये 14 रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील व्यवहार अंशिक स्वरुपात बंद करण्यात आले आहे.