इंद्र देवानं का दिला होता तो ‘श्राप’ ज्यामुळं प्रत्येक महिला भोगते मासिक पाळीची पीडा ! जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन –भागवतपुराणानुसार, ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा देवराज इंद्र देवाच्या क्रोधाचा फायदा घेऊन असुरांनी स्वर्गावर हल्ला केला. यानंतर इंद्र देवाला आपलं आसन सोडून पळावं लागलं होतं. यानंतर या समस्येच निराकरण करण्यासाठी ब्रह्मानं त्यांना सांगितलं की, त्यांनी एखाद्या ब्रह्मज्ञानीची सेवा करावी. यानंतर त्यांना आसन पुन्हा मिळू शकतं.

यानंतर इंद्र देवानं ब्रह्मज्ञानीची सेवा करायला सुरुवात केली. या ब्रह्मज्ञानीची माता एक असूर होती. परंतु इंद्र देवाला याबद्दल काहीच माहीती नव्हतं. त्यामुळं त्या ब्रह्मज्ञानीच्या मनात असुरांसाठी एक वेगळं स्थान होतं. त्यामुळंच तो इंद्र देवाची सारी हवन सामग्री देवतांऐवजी असुरांना अर्पण करत असे. हे कळताच इंद्र देवानं रागात ब्रह्मज्ञानीची हत्या केली जो एक राक्षस बनून त्यांच्या मागे लागला. बचाव करण्यासाठी ते एक फुलात लपले. एक लाख वर्ष त्यांनी भगवान विष्णुची तपस्या केली.

या तपस्येनंतर भगवान विष्णु खुश झाले आणि त्यांनी इंद्र देवांना वाचवलं. परंतु गुरूची हत्या केल्यानं त्यांच्यावर ब्रह्म हत्येचं पाप होतं. या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी विष्णुनं त्यांना एक सुचवलं. यात इंद्र देवाला आपल्यातील काही पाप झाड, भूमी, पाणी आणि स्त्रीमध्ये वाटायचं होतं. सोबतच इंद्र देव सर्वांना एक वरदानही देणार होते. त्यांनी चौघांनाही यासाठी मनवलं.

सर्वात आधी झाडानं एक चतुर्थांश भाग घेतला. यानंतर इंद्र देवांनी वरदान दिलं की, झाड हवं तर स्वत:ला जिवंत करू शकतं. यानंतर जल म्हणजेच पाण्याला पापाचा हिस्सा दिल्याबद्दल इंद्र देवांनी वरदान दिलं ज्यात पाण्याला इतर वस्तूंना पवित्र करण्याची शक्ती प्रदान केली. यामुळंच हिंदू धर्मात जल पवित्र मानलं जातं. याचा वापर पूजा पाठ करताना केला जातो. तिसरं पाप इंद्र देवांनी भूमीला दिलं. या बदल्यात वरदान दिलं की, तिला झालेली इजा नेहमीच भरून निघेल.

यानंतर आता शेवटची पाळी नारीची म्हणजेच स्त्रीची होती. स्त्रीनेही पापाचा हिस्सा घेतला. याचंच फळ म्हणून त्यांना मासिक पाळी येते. यानंतर इंद्र देवांनी महिलांना वरदान दिलं की, पुरुषांच्या तुलनेत त्या कामाचा आनंद चांगल्या प्रकारे घेऊ शकतील. त्यामुळंच महिलांना प्रत्येक महिन्यात हा त्रास सहन करावा लागतो.