धक्‍कादायक ! प्रियकराने लग्नास नकार दिल्याने विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रियकरासाठी सासर सोडून माहेरी आलेल्या विवाहित महिलेसोबत लग्न करण्यास प्रियकराने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या विवाहितेने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली. जामखेड तालुक्यात भुतवडा येथे ही घटना घडली.

याप्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सागर सुरेश डोके याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिणी बळीराम सदाफुले (वय २२) हे मयताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, रोहिणी हिचे गावातील सागर डोके याच्याशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते; मात्र, रोहिणीचे रीतसर लग्न होऊन ती सासरी नांदायला गेली होती. तरीदेखील दोघांचे प्रेमसंबंध सुरूच होते. आरोपी याने मृत मुलीस लग्न करतो, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे रोहिणी आपल्या नवऱ्याला सोडून माहेरी भुतवडा येथे राहण्यासाठी आली होती. शनिवारी (१३ जुलै) दुपारी गावात कार्यक्रम होता.

या वेळी सागर रोहिणीला भेटण्यासाठी आला होता. या वेळी तिने सागरला, ‘आपण लग्न कधी करायचे’, असे विचारले असता सागरने, ‘मी लग्न करणार नाही’, असे सांगितले आणि तेथून निघून गेला. त्यामुळे त्याच दिवशी दुपारी चारच्या सुमारास रोहिणी हिने आपल्या राहत्या घरात फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like