पोलीसनामा ऑनलाईन टीम – Women T20 World Cup | महिला टी 20 वर्ल्ड कपला 10 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. हि स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत पार पडणार आहे. यात भारताचा पहिलाच सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानबरोबर होणार आहे. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा पाकिस्तानला नमवण्याची संधी आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धेत 10 संघ सहभागी झाले आहेत. त्यांचे दोन ग्रुपमध्ये विभाजन करण्यात आले आहे. (Women T20 World Cup)
ग्रुप A मध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेश आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. तर ग्रुप B मध्ये भारत, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्टइंडीज या संघांचा समावेश करण्यात आला आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्स ग्राऊंड, पार्लमधील बोलँड पार्क आणि पोर्ट एलिझाबेथमधील सेंट जॉर्ज पार्क या तीन मैदानांवर या वर्ल्डकपमधील सगळे सामने खेळवण्यात येणार आहे. (Women T20 World Cup)
भारतीय संघ ग्रुप स्टेजमध्ये 4 सामने खेळणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत असणार आहे. ग्रुप स्टेजमधील सामने झाल्यानंतर दोन्ही ग्रुप मधील पहिल्या दोन संघांमध्ये सेमी फायनल राऊंड पार पडणार आहे. पहिली सेमी फायनल 23 फेब्रुवारीला तर दुसरी सेमी फायनल 24 फेब्रुवारीला होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी या वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
भारताचे सामने कधी आणि कोणाबरोबर होणार?
भारत ग्रुप स्टेज मध्ये 4 सामने खेळणार असून पहिला सामना 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान सोबत, दुसरा सामना 15 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज सोबत, तिसरा सामना 18 फेब्रुवारीला इंग्लड आणि चौथा सामना 20 फेब्रुवारी रोजी आयर्लंड सोबत होणार आहे. हे सगळे सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6:30 वाजता सुरु होणार आहेत.
कुठे पाहाल सामने :
भारतात महिला टी 20 वर्ल्डकप 2023 चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर करण्यात येणार आहे.
तसेच हे सामने डिझनी+हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येणार आहे.
भारताचा महिला टी 20 संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्ज,
हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकर,
राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.
Web Title :- Women T20 World Cup | icc womens t20 world cup full schedule india will play first match against pakistan
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update