पुणे अ‍ॅन्टी करप्शनचा धडाका सुरूच, महिला तहसीलदाराच्या अटकेने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आंबेगाव येथील तहसीलदार सुषमा पैकेकरी यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा रचून अटक केली. तहसीलदार सारख्या वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यावर पुणे जिल्ह्यातील अ‍ॅन्टी करप्शनने केलेली ही या वर्षातील आतापर्यंतची मोठी कारवाई ठरली आहे.

सुषमा पैकेकरी या मुळच्या सोलापूरच्या असून तेथे त्यांच्या आईवडिलांचे घर आहे. सध्या त्या घोडेगाव येथील तहसीलदार यांच्या घरी रहात होत्या. सुषमा पैकेकरी यांच्याविरोधात लाचेची तक्रार आल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सापळा रचतानाच त्यांच्या घरावरही पहारा ठेवला होता. कारवाई झाल्यानंतर कोणीही घरात जाऊन अथवा तेथून बाहेर जाऊ नये, यासाठी काळजी घेतली होती.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी तहसील कार्यालयात सापळा लावला. सायंकाळी सहा वाजता त्यांना तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरावर तातडीने छापा घालण्यात आला. तेथे रोख ४५ हजार रुपये व किरकोळ दागिने आढळले. दुसरा शनिवारी व रविवार असल्याने सुषमा पैकेकरी या सोलापूरला आपल्या घरी जाऊन कालच घोडेगावला परत आल्या होत्या.

सुषमा पैकेकरी या २००१ मध्ये नायब तहसीलदार म्हणून महसुल विभागात कार्यरत आहेत. यावर्षी पुण्यातील वस्तू व सेवा कर विभागातील कर अधिकारी रामकृष्ण माने याला १ लाख रुपये घेताना पकडण्यात आले होते.

पुण्यातील मुळशीचे तहसीलदार सचिन डोंगरे यांना डिसेंबर २०१८ मध्ये १ कोटी रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. लव्हासा रोडवर ही कारवाई करण्यात आली. वारस नोंदीच्या प्रकरणात निकालपत्र आणि सातबारा उताऱ्यात फेरफार करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती. त्यावरुन शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तहसीलदारावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like