महिला तहसीलदार १ लाखाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एक लाख रुपयांच्या लाच प्रकरणी घोडेगावच्या तहसीलदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभाग अ‍ॅन्टी करप्शनच्या रडारवर असून आजच्या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.

सुषमा पैकेकरी असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे.

घोडेगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात प्रांतधिकारी संजय पाटील यांनी कार्यवाही करून डबर वाहतुक करणारी ट्रक आणून ठेवली होती. तहसिलदार सुषमा पैकेकरी यांनी डबर वाहतुक करणाऱ्या ट्रकवर २ लाख ४१ हजार ५० रूपये दंड आकारणार असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. तक्रारदार व तहसिलदार सुषमा पैकेकरी यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार ४६ हजार रूपये दंड व १ लाख रूपये लाच देण्याचे ठरले. यावरून तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज (दि.१६) सायंकाळी ६ वाजता तहसील कार्य़ालयामध्ये ५० हजार रूपयांची रोख लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

You might also like