‘कोरोना’ लस घेण्यात महिला ठरल्या अव्वल, तर जागतिक स्तरावर भारत तिसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना प्रतिबंध लसीला १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. तसेच यामध्ये पुरुषाला सर्वाधिक कोरोना संसर्ग झाले असल्याची माहिती यामधून समजली. परंतु अद्याप जरी तसे असले तरी, आता कोरोना लस घेण्यात महिला आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. तर या ,माहीती प्रमाणे आतापर्यंत ६३ टक्के महिलांनी कोरोना लसीचा डोस घेतल्याचे समजते. व महिला अव्वल ठरल्या आहेत. तर जागतिक स्तरावरील भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

अधिक माहितीनुसार, भारतात ७ फेब्रुवारीपर्यंत ५५ लाखांहून अधिक जणांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. केवळ २१ दिवसांत ५० लाख नागरिकांना कोरोना लस देण्याचा विक्रमही भारताच्या नावावर झाला. तसेच, केंद्र सरकारने विकसित केलेल्या को-विनवरून मिळालेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारीपर्यंत भारतात ५५ लाख ६२ हजार ६२१ जणांना लस देण्यात आली. यापैकी ३५ लाख ४४ हजार ४५८ महिला आहेत. आणि २० लाख ६१ हजार ७०६ पुरुषांचा समावेश आहे. या अधिक संख्येत सर्व महिला आरोग्य सेविका असल्याची माहिती समजते.

दरम्यान, आरोग्य सेतु ॲपमध्ये लसीकरणाशी संदर्भात एक भाग जोडण्यात आला असून, येथे लाभार्थी क्रमांक समाविष्ट केल्यास तात्पुरते प्रमाणपत्र मिळू शकते. तसेच आपल्या क्षेत्रात कोरोना लसीकरण बुथ कुठे आहेत, आतापर्यंत तेथे किती जणांचे लसीकरण झाले, यांसारखी माहितीही आता आरोग्य सेतु ॲपवर उपलब्ध होणार आहे.