Home Remedies : पब्लिक टॉयलेटच्या वापराने होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार, करा ‘हे’ 4 घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम : महिलांमध्ये अनेकदा पब्लिक टॉयलेटच्या वापरामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (युटीआय) ची समस्या समोर येते. या आजारात युरिनरी पार्ट, किडनी, ब्लॅडर आणि गर्भपिशवीमध्ये फंगस, व्हायरस आणि बॅक्टीरियामुळे सूज येते. जास्तीत जास्त हा आजार युरिनरी पार्ट आणि ब्लॅडरमध्ये होतो. यामुळे महिलांना लघवी करताना मूत्रमार्गात जळजळ होते, लघवीसोबत थोडे रक्त येते आणि अशाच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु जर तुम्ही योग्यवेळी लक्ष दिले तर ही समस्या दूर होऊ शकते. यासाठी काही घरगुती उपचार उपयोगी ठरू शकतात.

हे आहेत उपाय
1 अशी फळे आणि भाज्या खा ज्यांच्यामध्ये सायट्रिक अ‍ॅसिडची मात्रा भरपूर असेल. सायट्रिक अ‍ॅसिड या इन्फेक्शनच्या विषाणूंना नष्ट करते.

2 गहू आणि खडीसाखर मिसळून खाल्ल्याने फायदा होतो. रात्री एक मुठ गहू पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी काढून टाका आणि गव्हात एक चमचा वाटलेली खडीसाखर टाकून चांगले मिसळून घ्या आणि सेवन करा.

3 सूखलेला आवळा सेवन करा. आवळा आणि वेलची बारिक करून मिसळा. यामध्ये कोमट पाणी टाका आणि प्या.

4 जास्तीत जास्त पाणी प्या.