CISF जवानाचे प्राण वाचवून प्रेमविवाह करणारी महिला लढणार निवडणूक

पलक्कड : ऐकण्यास ही गोष्टी तुम्हाला फिल्मी वाटू शकते. आजपासून सुमारे 10 वर्षांपूर्वी छत्तीसगढच्या ज्योतीने आपल्या राज्यात एका अ‍ॅक्सीडेंटच्या दरम्यान केरळचा रहिवाशी असलेला सीआयएसएफ जवान विकास यांचा जीव वाचवला होता. या दरम्यान, तिचे जवानावर प्रेम जडले आणि गोष्ट लग्नापर्यंत पोहचली. आता 30 वर्षांची ज्योती 10 डिसेंबरला केरळमध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राजकीय आखाडा बनलेल्या पलक्कड जिल्ह्यातील कोलांगोडे ब्लॉक पंचायतीतून भाजपा उमेदवार म्हणून लढत आहे.

आता उत्कृष्ट मल्याळम बोलणार्‍या ज्योतीने सांगितले की, 3 जानेवारी, 2010 ला झालेल्या अ‍ॅक्सीडेंटमध्ये मला माझी डावी बाजू गमवावी लागली, परंतु हा अ‍ॅक्सीडेंट माझ्या जीवनाचा टर्निंग पॉईंट बनला. माझे विकासवर प्रेम जडले. ज्योतीला छत्तीसगढला आपल्या आई-वडिलांच्या घरी परतल्यावर त्यांच्या रागाचा सामना करावा लागला, तसेच तिला आपला बीएससी नर्सिंगचा अभ्यास सुद्धा अर्धवट सोडावा लागला. परंतु, विकासच्या बाबतीत ती ठाम राहिली. सुमारे एक वर्षानंतर केरळला पोहचून तिने विकाससोबत लग्न केले. विकासच्या कुटुंबियांना सुद्धा ज्योतीने आनंदाने स्वीकारले.

आपल्या अ‍ॅक्सीडेंटची आठवण सांगताना ती म्हणाली, ती बसने आपल्या कॉलेज हॉस्टेलला परतत होती. विकास आपल्या भावाला भेटल्यानंतर दंतेवाडा जिल्ह्यात सीआयएसएफ कॅम्पमध्ये परतत होता. थकव्यामुळे विकास बसच्या खिडकीच्या रेलिंगवर डोकं ठेवून झोपला होता. ज्योतीने सांगितले की, तिने पाहिले की, एक ट्रक नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने बसकडे त्याच बाजूने येत होता, ज्या बाजूला ते दोघे बसले होते. धोका ओळखून ज्योतीने विकासला खिडकीपासून दूर ओढले, यामुळे विकासचा जीव वाचला, परंतु तिची एक बाजू जखमी झाली.

ज्योतीला निवडणुकीत विजयाची पूर्ण खात्री आहे. तिने म्हटले, मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता ते माझ्यासाठी मत टाकतात की नाही, ही दुसरी गोष्ट आहे.