महिलेने ‘किम जोंग’च्या फोटोऐवजी आपल्या मुलीस वाचवले, महिलेस मिळणार ‘शिक्षा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर कोरिया चे नेते किम जोंग यांची तानाशाही संपूर्ण जगात चर्चेचा विषय आहे. या दरम्यानच एक प्रकरण उघडकीस आले असून त्यात एका महिलेला शिक्षा देण्यात येत आहे, आणि या शिक्षेमागील कारण म्हणजे त्या महिलेच्या घरात आग लागली होती. त्या आगीपासून तिने किम जोंग च्या फोटोस न वाचवता आपल्या मुलीला वाचवले. या कारणामुळे तिला शिक्षा होणार आहे.

उत्तर कोरियात असा नियम बनवण्यात आला आहे की, प्रत्येकाच्या घरात किम जोंग चा फोटो लावणे आवश्यक आहे. आरोपी महिला हैमयोंग प्रांत च्या ऑनसॉन्ग मध्ये आपल्या परिवारासह वास्तव्य करते, त्यांच्या बरोबरच अजून एक परिवार वास्तव्यास आहे.

या दरम्यान त्यांच्या घराला अचानक आग लागल्याने ते सर्व लोक घराच्या बाहेर आले. परंतु या आगीतून त्यांना किम जोंग चा फोटो वाचविता आला नाही. त्यामुळे त्या महिलेला आरोपी ठरवण्यात आले आहे. तथापि, अजून तरी महिलेच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही.

महिलेवर आरोप आहे की , घरात लागलेल्या आगीतून किम इल – सुंग आणि किम जोंग यांच्या फोटोऐवजी आपल्या मुलीस वाचविले. आता महिलेस शिक्षा होणार असून तिच्यावर ‘पॉलिटिकल क्राइम’ चा आरोप आहे.

मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी या प्रकरणाचा तपास करत असून असे सांगितले जात आहे की, त्या महिलेस जेल मध्ये जावे लागणार आहे.

असे प्रकरण आधी देखील आले आहेत समोर –

हे पहिले प्रकरण नाही की किम जोंग यांच्या फोटोला आग लागली आहे. याआधी देखील असे भरपूर प्रकार समोर आले आहेत. तथापि, आगीपासून फोटो वाचविणाऱ्यांना सन्मानित देखील करण्यात आले आहे.

एका वेळेस उत्तर कोरियातच एका घराला आग लागली होती. आणि त्या घटनेत काही मुलांना जीव गमवावा लागला होता. कारण ते किम जोंग यांच्या फोटोस वाचविण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा त्यांचा मृतदेह मिळाला तेव्हा त्यांच्या हातात किम जोंग चा फोटो होता.

अशीच एक घटना २०१२ मध्ये समोर आली होती. तेव्हा एक मुलगी किम जोंग यांच्या फोटोस वाचविण्याच्या नादात पुरात अडकली होती. त्या दरम्यानच तिचा पुरात बळी गेला. त्यानंतर त्या मुलीला किम जोंग – इल यूथ ऑनर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले होते. एवढेच नाही तर तिच्या शाळेचे नाव देखील बदलून तिच्या नावावरून ठेवण्यात आले.

फोटो लावणे आहे अनिवार्य –

उत्तर कोरियात एका कायद्यानुसार किम परिवाराच्या सर्व सदस्यांना सन्मान देणे आणि त्यांचा फोटो घरात लावणे अनिवार्य आहे. जर याचे उल्लंघन कुणाकडून होत असेल तर त्याला पॉलिटिकल क्राइम गृहीत धरले जाते आणि शिक्षा दिली जाते.

उत्तर कोरियाच्या नियमांनुसार, किम परिवाराच्या सर्व फोटोंना अशा श्रद्धेने जपायचे जसे आपण आपल्या स्वत:च्या फोटोला जपतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/