महिलांच्या खात्यात जमा होतील 72 हजार रुपये’ : काँग्रेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूनतम आय योजनेअंतर्गत ज्यांचं उत्पन्न 12 रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना वर्षाला 72 हजार रुपये मिळणार अशी घोषणा काल (सोमवार दि. 25 मार्च) काँग्रेसने केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेत या योजनेची माहिती दिली. या योजनेबाबत त्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. 72 हजार रुपये थेट घरातली गृहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. अशी माहिती काँग्रेसने दिली आज दिली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत या योजनेबाबत अधिक माहिती दिली आहे.

घरातील गृहीणीच्या खात्यात थेट जमा करणार 72 हजार रुपये

पत्रकारांशी बोलताना रणदीप सिहं सुरजेवाला म्हणाले की, “येत्या 5 वर्षात आमचं सरकार आल्यास न्यूनतम आय योजना सुरु करणार आहोत. 20 टक्के आर्थिकदृष्ट्या कुटुंबांना वर्षाला 72 हजार रुपये देणार आहोत. देशातील 25 कोटी लोकांना किमान उत्पन्नाची हमी देणार आहोत. ही कोणतीही टाॅपअप स्किम नाही. ही स्किम विमेन सेंट्रीक आहे. सदर 72 हजार रुपये घरातील गृहीणीच्या खात्यात थेट जमा केले जातील. ही योजना देशातील शहर आणि गाव अशा सर्व भागातील गरीबांसाठी लागू असेल. गरीबीवर प्रहार करणारी ही जगातील सर्वात मोठी स्किम आहे.” असा दावा सुरजेवाला यांनी यावेळी बोलताना केला.

यावेळी सुरजेवाला यांनी या स्किमला विरोध करणाऱ्या भाजपवर जोरदार टीक केली. ते म्हणाले की, “नरेंद्र मोदी श्रीमंतांना पैसे देऊ शकतात, तर आम्ही गरीबांना पैसे देऊन या देशातून गरीबी हटविणार आहोत. परंतु श्रीमंतांचं कर्ज माफ करणारेच आज गरिबांच्या योजनेला विरोध करत असून विरोध करणारे ढोंगी आहेत. 10 लाखांचा सूट परिधान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांच्या या योजनेला विरोध का करत आहेत ? असा सवालही त्यांनी केला.