अंसेवदनशील वक्तव्याप्रकरणी काँग्रेसच्या ‘त्या’ आमदाराला महिला आयोगाची नोटीस

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – असंवेदनशील वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांना महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. त्याचसोबत सुभाष धोटे, आमदार सुरेश धानोरकर यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. राजुऱ्यात आदिवाशी वसतिगृहात लैंगिक शोषण घटनेच्या प्रकरणावरून पॉक्सोबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
‘पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर सरकारकडून पैसे मिळतील आणि त्यामुळे आदिवासी मुली आत्याचार झाल्याची तक्रार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत’, असे संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केले होते. या वक्तव्याचा आदिवासी समाजातर्फे तीव्र निषेध करण्यात आला .

लोकप्रतिनींधींचे वक्तव्य हे आदिवासी समाजाचा अपमान असल्याची भावना प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी व्यक्त केली होती. यावेळी संतप्त महिलांनी काँग्रेस नेत्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला चपला मारून राग व्यक्त केला. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी काँग्रेस नेत्यांचे हे वक्तव्य म्हणजे बलात्कार पीडित मुलींमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

भाजपने या दोन नेत्यांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणानंत लोकांमध्ये पसरलेला रोष पाहून या दोघांनी आदिवासी समाजाची माफी मागितली. हे प्रकरण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. कारण त्यांची या पदावरून हाकालपट्टी होणार हे निश्चित झाले आहे.