Women’s Day 2021 : माझ्या ‘त्या’ गोष्टीचीही खिल्ली उडवली गेली, ‘बेबी डॉल’ सनीचा खुलासा (व्हिडीओ)
बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल ॲक्ट्रेस सनी लिओनी (Sunny Leone) अनेकदा आपल्या हॉटनेसमुळं चर्चेत येताना दिसत असते. हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याचा जणू तिचा छंदच आहे. खास बात अशी की, सनीनं फक्त फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेच तो व्हायरल होताना दिसत असतो. यावेळीही सनी चर्चेत आली आहे. परंतु याचं कारण तिचा बोल्डनेस किंवा हॉटनेस नसून काही खुलासे आहेत. आज महिला दिनाच्या निमित्तानं तिनं तिच्या संघर्ष काळातील काही खुलासे केले आहेत.
सनीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती म्हणते की, जेव्हा मी 21 वर्षांची होते तेव्हा माझ्यावर लोक नेहमीच संताप व्यक्त करायचे. माझा तिरस्कार करायचे. मला काम मिळणं बंद झालं होतं. कोणीच पसंत करत नसल्यानं मला इंडस्ट्रीतून बॉयकॉट करण्यात आलं होतं. माझ्या प्रत्येक गोष्टीची खिल्ली उडवली जात होती. इंडस्ट्रीतून कधी काम मिळालं ना कधी सपोर्ट. परंतु मी हार न मानता प्रयत्न करत राहिले. सुरुवातीला लोकांनी मला नाकारलं. काम देणं बंद केलं. परंतु मोठ्या मेहनतीनं आज मी साऱ्यांची पसंती मिळवली आहे. आज मी माझी ड्रिम लाईफ जगत आहे.
पुढं बोलताना सनी म्हणते, माझ्या सोबत ज्यांना काम करायचंय त्यांच्यासोबत मला काम करायचंय, इतकं सोप आहे. यावर मी जास्त काही विचार करत नाही. मी खूप रिॲलिस्टीक आहे. जे माझ्या ताटात वाढलं आहे ते खायला आवडतं. सर्वात चांगला माणूस बनणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.
सनीनं शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे. अनेकांना हा व्हिडीओ आवडल्याचं त्यांनी सांगितलं आहे.