International Women’s Day | दलित महिला उद्योगविश्वात यशाचे शिखर गाठू शकतात – पद्मश्री मिलिंद कांबळे

‘डिक्की’ने केले महिला उद्योजिकाच्या यशोगाथा असणाऱ्या “यशस्विनी ” पुस्तकाचे प्रकाशन –

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – International Women’s Day | दलित महिला अत्यंत कष्टाळू, मेहनती, धाडसी तसेच प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उठवणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता उद्योग क्षेत्रात आल्यास यशाचे शिखर गाठू शकतात आणि तेच यशस्विनी या पुस्तकातून दिसून येत आहे असे मत दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे संस्थापक व आय आय एम जम्मू चे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले. आज जागतिक महीला दिनानिमित्त डीक्कीच्या (DICCI) वतीने सिमा कांबळे लिखित यशस्विनी या पुस्तक प्रकाशन समारंभ व महिला सबलीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रंगी पद्मश्री कांबळे बोलत होते. (International Women’s Day)

 

पुढे ते म्हणाले की, भारत सरकार विविध योजना व नवे उपक्रम राबवित आहे त्याचा योग्य उपयोग महिलांना करून घ्यावा. तसेच महिलांना व्यवसायात उभे करण्यासाठी डिक्की आपल्या पाठीशी उभे राहून आपला उद्योग उभा करण्यासाठी मोलाची मदत करेल असा विश्वास पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी उपस्थित महिलांना दिला. (International Women’s Day)

 

सिमा कांबळे लिखित यशस्विनी या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय स्त्री शक्तीच्या उपाध्यक्षा व बँक ऑफ महाराष्ट्रच्या डेप्युटी जनरल मॅनेजर नयना सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तकाच्या लेखिका सिमा कांबळे यांनी या पुस्तकातील यशस्वी उद्योजकाचा सर्वांनी आदर्श घ्यावा व नव्या दलीत महिला उद्योग करू पाहणाऱ्यांना हे पुस्तक प्रेरणा देईल आणि त्याच उद्देशाने हे पुस्तक मी लीहले आहे.

नयना सहस्रबुद्धे यांनी भारतीय महिला या अतिशय प्रामाणिक व बुद्धिमान आहेत .सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज सर्व बँकाचा कर्ज फेडण्याचा आलेख पाहिल्यास महिला या अतिशय योग्य पद्धतीने कर्ज परत फेड करीत आहेत .आणि महिलांचे नॉन पर्फॉन्स असेट चे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे महिलांना सर्व बँकांचा कर्ज देण्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन आहे त्याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा व यशस्वी उद्योजक व्हावे असे म्हणाल्या.

 

या वेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब (भारत सरकार) व सिडबी यांनी आपल्या विविध योजनांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमास पद्मश्री मिलिंद कांबळे, नयना सहस्रबुद्धे, डिक्की चे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री रवी नाररा,
G 20 चे महाराष्ट्र प्रमुख राजेश पांडे, रिपब्लिकन युवा मोर्चा च्या प्रदेशाध्यक्षा सुवर्णा डंबाळे,
भारतीय विचार साधना चे उपाध्यक्ष चित्तरंजन भागवत, अंजली कुमार श्रीवास्तव, डीक्की चे प्रदेशाध्यक्ष मुकुंद कमलाकर,
पुणे शहराध्यक्ष राजू साळवे, डिक्की नेक्स्ट जन च्या मैत्रय कांबळे, अविनाश जगताप, संतोष कांबळे,
डीक्की महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा उबाळे,
निवेदिता कांबळे यासह दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.

 

G 20 ही भारताला मिळालेली मोठी संधी आहे .त्यात दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे
यांना B 20 चे जगभरातील उद्योजकांसाठी चे सर्वसमावेशक धोरण ठरविण्याची जबाबदारी मिळाली आहे.
ही आपणा सर्वासाठी अभिमानाची बाब आहे असे G 20 चे महाराष्ट्र प्रमुख राजेश पांडे दुसऱ्या सत्रातील आपल्या मनोगतात म्हणाले.

 

Web Title :- Women’s Day | Dalit women can reach the pinnacle of success in industry – Padmashri Milind Kamble

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dr. Vijaykumar Gavit | संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार; आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Economic Survey of Maharashtra | ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ अहवाल विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर

Pune Crime News | कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या