महिलांचे मंगळसूत्र पळविणारा सराईत अटकेत ; ४ लाखांचा ऐवज जप्त

वडगाव मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – लग्न समारंभात आणि पायी जाणा-या महिलांचे मंगळसुत्र पळविणा-या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन वर्षापूर्वीच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून ४ लाख रुपये किंमतीची मंगळसुत्र जप्त करण्यात आली आहेत.

कबीर बाबु राजपूत उर्फ मनावत (रा. पुसाणे ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मागीलवर्षी वडगाव येथील एका मंगल कार्यालयात खडकी येथील सविता घोरपडे यांचे आठ तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावत पळवून नेले होते. तर न्यू इंग्लिश स्कूल येथून पायी जाणा-या वंदना म्हाळसकर यांच्या गळ्यातील साडेसात तोळ्याचे मंगळसुत्र पळविले होते.

या गु्ह्यातील आरोपी तळेगाव-उर्से खिंडीत येत असल्याची माहिती गस्तीवरील पोलिसांना समजली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने खिंडीमध्ये सापळा रचून आरोपी कबीर राजपूत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत

काळजी घ्या ; कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी

हे दोन पदार्थ टाळा ; अन्यथा ‘स्नायू’ होतील कमजोर

You might also like