महिलांचे आरोग्य महत्त्वाचे डाॅ.अनुप ताम्हणकर

थेऊर – कुटूंबातील इतर सदस्याच्या आरोग्याची काळजी घेत असताना ती महिला स्वतःच्या आरोग्याकडे दूर्लक्ष करते परंतु ती कुटूंबातील अतिशय महत्वाची सदस्य असल्याने तिने स्वतःची काळजी घ्यावी कारण गृहीणी निरोगी असेल तर कुटूंब सुखी व संपन्न होऊ शकते असे प्रसिद्ध कर्करोगतज्ञ डाॅ. अनुप ताम्हणकर यांनी आपले विचार मांडले. ते लोणी काळभोर येथे बॅंक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत ग्रामीण महिला व बालक विकास मंडळातर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी बॅक ऑफ महाराष्ट्रच्या पूर्व आंचल विभागाच्या व्यवस्थापीका वीना राव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.तसेच मंडळाचे सचिव संतोष गदादे व आधार बावीसकर उपस्थित होते.तसेच जवळपास पंन्नास महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी महिलांमधील अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेल्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली तसेच अनेकांना याची लागण झालेली सुध्दा समजून येत नाही त्यामुळे महिलांनी नियमितपणे आरोग्य तपासणी करुन घेतली पाहिजे असे आवाहन व्यवस्थापीका वीना राव यांनी केले.

या कार्यक्रमासाठी मंडळाच्या समन्विका संगीता काळभोर व मीना कुंभारकर यांनी मोलाचा सहभाग घेतला.