Women’s Health | उन्हाळ्यात पीरियड्समध्ये दुर्लक्ष करून नका ‘या’ 5 हायजीन टिप्सकडे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – Women’s Health | मेन्स्ट्रूअल सायकल (Menstrual Cycle) यूटेरसमधून ब्लड आणि टिश्यूज हटवण्याची मासिक प्रक्रिया आहे जी महिलांमध्ये वयाच्या 13-14 व्या वर्षी सुरू होते (Women’s Health). मासिक पाळीचे पहिले तीन दिवस महिलांसाठी खूप त्रासदायक असतात (Menstrual Period Pain). यादरम्यान महिलांच्या शरीरात प्रोस्टॅग्लँडिन रसायन (Prostaglandin Chemical) निर्माण होऊन अनेक समस्या निर्माण होतात. (Know The 5 Useful Menstrual Hygiene Tips In Summer)

 

प्रोस्टॅग्लँडिन गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये आकुंचन वाढवतात. ज्या महिलांमध्ये प्रोस्टॅग्लँडिन्स जास्त असतात त्यांना मासिक पाळीत जास्त आकुंचन झाल्यामुळे वेदना होतात (Painful Menstrual Periods).

 

मासिक पाळीचे तीन दिवस वेदना आणि अस्वस्थता देतात, तर उन्हाळ्यात हा त्रास आणखी वाढतो. पहिल्या तीन दिवसांत जास्त प्रवाह आणि त्यासोबत येणारा घाम महिलांना त्रासदायक ठरतो. उन्हाळ्यात योनीमार्गाच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते अन्यथा संसर्गाचा धोका वाढू लागतो (Women’s Health).

 

मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे. येथे आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे हे कठीण दिवस सोपे करू शकता (Menstrual Pain Relieve Tips).

 

1. चार तासात पॅड बदला (Change Pad In Four Hours) :

जेव्हा शरीर दिवसा जास्त सक्रिय असते तेव्हा रक्त प्रवाह देखील जास्त असतो, त्यामुळे पॅड अधिक रक्त, घाम आणि सीबम शोषून घेतो. ही स्थिती बॅक्टेरियांच्या वाढीसाठी अनुकूल असते. जर तुम्हाला त्वचेचा संसर्ग टाळायचा असेल तर दिवसातून चार तासांपेक्षा जास्त वेळ पॅड लावू नका.

 

2. व्यवस्थित वॉश करा (Wash Properly) :

मासिक पाळीत बॅक्टेरिया वाढण्यासाठी रक्त अनुकूल वातावरण तयार करते, म्हणून जननेंद्रियाचा भाग दिवसातून किमान दोनदा धुवा. योनी खुपच जास्त धुतल्याने पीएच संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे यीस्ट इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल वेजिनोसिस होण्याचा धोका असतो.

 

3. योनीचा परिसर कोरडा ठेवा (Keep Vaginal Area Dry) :

उन्हाळ्यात लघवी केल्यावर लगेच योनी पुसून टाका, या ऋतूत योनी कोरडी ठेवा. ओलेपणा बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देऊ शकतो आणि जळजळ होऊ शकते. तुम्ही योनीवर अँटीसेप्टिक पावडर देखील वापरू शकता.

 

4. सुगंध प्रॉडक्ट वापरू नका (Don’t Use Fragrance Products) :

योनी जास्त स्वच्छ करण्याची गरज नाही, तो एक सेल्फ क्लिनिंग ऑर्गन आहे.
योनीच्या स्वच्छतेसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे सुगंधी साबण किंवा इतर कॉस्मेटिक उत्पादने वापरणे टाळा.
उन्हाळ्यात योनी स्वच्छ करायची असेल तर साबणाशिवाय कोमट पाण्याने स्वच्छ करा.

 

5. सुती कपडे घाला (Wear Cotton Clothes) :

मासिक पाळी दरम्यान घट्ट अंडरगार्मेंट घालणे टाळा. घट्ट कपडे त्वचेला श्वास घेऊ देत नाहीत.
उन्हाळ्यात सिंथेटिक कपड्यांमुळे ओलावा आणि उष्णता वाढते,
त्यामुळे बॅक्टेरिया वाढतात. उन्हाळ्यात सुती अंडरगार्मेंट आणि सैल कपडे घाला.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Women’s Health | know the 5 useful menstrual hygiene tips in summer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा