महिला हॉकी संघाचे उपांत्य  फेरीवर शिक्कामोर्तब 

जकार्ता : वृत्तसंस्था 

भारतीय महिला हाॅकी संघाने थायलॅंड संघाचा ५-० ने पराभव करत उपांत्यफेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. यामध्ये भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल हिने ३ गोल करत हॅट्रिक साधली आहे.

[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b5ff221-aa94-11e8-8c00-57c04b9a2f1a’]

 सामन्याच्या सुरुवातीला  भारतीय संघाने अनेक हल्ले केले; परंतु त्यांना गोल नोंदवण्यात अपयश आले.  अनेक संधी गमावल्याने मध्यांतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.उत्तरार्धात भारताने अधिक आक्रमक खेळ केला  भारताकडून पहिला गोल  ३७ व्या मिनिटाला झाला . कर्णधार रानी रामपालने रिबाउंडवर गोल नोेंदवून संघाचे खाते उघडले. रानीनेच ४६ व्या मिनिटाला संघाचा आणि स्वत:चा गोल नोंदवून संघाला २-० ने आघाडी मिळवून दिली.

‘गोल्डन गर्ल’ विनेश फोगट ने केला विमानतळावरच साखरपुडा

यानंतर नवज्योतने ५४ व्या मिनिटाला गोल करून भारताची आघाडी  ४-० अशी दणदणीत केली. ५५  व्या मिनिटाला रानीने हॅट्ट्रिक करताना  ५-० ने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले .

साखळी गटात भारताने गतविजेत्या दक्षिण कोरियाला मागे टाकून अव्वल स्थान घेतले. कोरियास नऊ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पोलिस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर यांना मुदतवाढ ?