Womens IPL | बीसीसीआयचे अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी पार पडणार महिलांच्या आयपीएलचा लिलाव; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : या वर्षांपासून महिलांची आयपीएल (Womens IPL) पार पडणार आहे. या आयपीएलची घोषणा बीसीसीआयने अगोदरच केली होती. हि स्पर्धा सुरु होण्याच्या अगोदर महिलांच्या आयपीएलचा (Womens IPL) लिलाव पार पडणार आहे. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. हा लिलाव कोणत्या तारखेला आणि कुठे घ्यायचा याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला आहे.

काही दिवसांपूर्वीच 19 वर्षांखालील महिलांच्या संघाने विश्वकप जिंकला होता. या संघाचे नेतृत्व शेफाली वर्मा हिने केले होते. भारताचा माजी खेळाडू मास्टर – ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत बीसीसीआयने विश्वविजेत्या महिला संघाला पाच कोटी रुपयांचे बक्षिस प्रदान केले होते.या विश्वविजयामुळे महिलांच्या आयपीएलला चांगला पाठिंबा मिळेल, असे मत सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केले होते. (Womens IPL)

यानंतर बीसीसीआयने या लिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर केले आहे.
हा लिलाव आता मुंबईमध्ये पार पडणार आहे.
13 फेब्रुवारी रोजी हा लिलाव मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये होणार आहे.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला येथील संकुलामध्ये जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर ही एक मोठी इमारत आहे.
या इमारतीमध्ये एक सांस्कृतिक केंद्र आहे.
या सांस्कृतिक केंद्रात एकाच वेळेला बरेच कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात.
त्यामुळे ही जागा महिला आयपीएलच्या लिलावासाठी पुरेशी आहे.
हा लिलाव पार पडल्यानंतर महिलांच्या आयपीएलचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता कोणत्या महिला खेळाडूला मोठी बोली लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :-  Womens IPL | bcci has decided when and where the womens ipl auction will be held

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police API Suspended | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

Chitrashi Rawat | ‘चक दे इंडिया’ फेम चित्राशी रावतनी 11 वर्षे डेटींगनंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय

K Viswanath Passes Away | ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ विजेते तेलगू दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे निधन