पुण्यात विनयभंगाचे प्रकार ; ‘तू माझी नाही तर कोणाचीच नाही’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावरून संपर्क करत तरुणीला वारंवार त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘तू माझी नाही तर कोणाचीच नाही’ असे म्हणून तरुणीचा विनयभंग केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच ठिकाणी काम करत असताना सहकाऱ्याने तरुणीचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वाकड पोलीस ठाण्यात ३० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार किरण तौर (रा. राहटणी. मूळ रा. शिरगाव थडी, ता. माजलगाव, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला वारंवार मोबाईल फोनद्वारे संपर्क करत तसेच फेसबुक आणि व्हाट्सअप वरून मेसेज द्वारे शिवीगाळ केली. ‘तू माझा फोन का घेत नाहीस, मी तुला जीवे मारून टाकीन, तू माझी नाही तर कोणाचीच नाही’ अशी धमकी आरोपीने फिर्यादी तरुणीला दिली. तपास वाकड पोलीस करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यात सचिन छाजेड (४५, रा.कोंढवा, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तरूणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपी सचिन हिंजवडीतील एका औषधाच्या दुकानात कामाला होते. सचिन हा सतत कामाच्या बहाण्याने फिर्यादीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून फिर्यादी तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई 

त्या हजार जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच