फ्रेंडशिपसाठी महिलेला फोन करणाऱ्या रोमियोची धुलाई

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – एक रोमियोने फ्रेंडशिप करण्यासाठी एका महिलेला मागील दोन महिन्यापासून फोन करून त्रास देत होता. हा प्रकार महिलेने घरच्यांना सांगितल्यानंतर रोमियो आणि त्याच्या मित्राची महिलेच्या नातेवाईकांनी धुलाई केली. तसेच दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनीदेखील खाकीचा हिसका रोमीयोला दाखवल्यानंतर या रोमियोने महिलेच्या पाया पडून माफी मागितली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रमेश देविदास राठोड (२५) हा एका विवाहित महिलेस फोन करून ४ सप्टेंबरपासून त्रास देत होता. अखेर या महिलेने हा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी फोन करुन रमेशला ताकीद दिली. मात्र, त्यानंतरही त्याने मित्राच्या मोबाईलवरून महिलेला फोन केला. यानंतर महिलेने पोलिसात तक्रार केली. पोलीस कॉन्स्टेबल राहुल यांनी महिलेला त्याच्याशी संवाद साधायला सांगीतला; मात्र, तो दुसऱ्याचा मोबाइल वापरत असल्याने तिसरा पोलिसांच्या हाती लागला आणि त्याने मित्राला फोन दिला. नंतर रमेश राठोड पोलिसांच्या तावडीत सापडला.

चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलास मारहाण, पोलिसावर गुन्हा दाखल

दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याआधी महिलेचे नातेवाईक त्याच्या घरी पोहचल्याने त्यांनी या रोमियोची जबरदस्त धुलाई करून पोलिसांच्या स्वाधिन केले. राठोडचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात